AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘दिल को करार आया…’, क्लासिकल लूकसह नेहाच्या अदांनी घायाळ झाले चाहते, पाहा व्हिडीओ

नेहा कक्करने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये आपण हे पाहू शकतो की, नेहा पारंपारिक अवतारात दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने सुंदर हिरव्या रंगाचा सूट परिधान केला आहे आणि कानात हेवी झुमके घातले आहेत. तिच्या कपाळावरील बिंदीमुळे ती आणखीन सुंदर दिसत आहे.

Video | ‘दिल को करार आया...’, क्लासिकल लूकसह नेहाच्या अदांनी घायाळ झाले चाहते, पाहा व्हिडीओ
नेहा कक्कर
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 2:30 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) बर्‍याच चर्चेत राहत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नेहाचे चाहते सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओजची आतुरतेने वाट पाहत असतात. नेहा कक्करने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती क्लासिकल लूकमध्ये दिसली आहे. व्हिडीओमध्ये ती ‘दिल को करार आया’ (Dil Ko Karaar Aaya) या गाण्यावर क्युट एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे (Neha Kakkar perform on song Dil Ko Karaar Aaya see her classical look).

नेहा कक्करने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये आपण हे पाहू शकतो की, नेहा पारंपारिक अवतारात दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने सुंदर हिरव्या रंगाचा सूट परिधान केला आहे आणि कानात हेवी झुमके घातले आहेत. तिच्या कपाळावरील बिंदीमुळे ती आणखीन सुंदर दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

तसेच व्हिडीओमध्ये ती स्वतः गायलेल्या ‘दिल को करार आया’ गाण्यावर क्युट एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतो आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना तिचा भाऊ टोनी कक्कर याने ‘हे गाणं आणि तू’ असं लिहिलं आहे.

गायिका  नेहा कक्कर हिने नुकताच तिचा 33 वा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचे ‘कद तैनु में दसा’ हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते, जे लोकांना खूपच आवडले आहे.

नेहाच्या नव्या गाण्याची चर्चा!

गायिका नेहा कक्कर (Neha kakkar) हिच्या आवाजाचे अनेक चाहते दिवाने आहेत. तिच्या गाण्यांबरोबरच तिच्या डान्सच्या व्हिडीओंनी देखील सोशल मीडियावर मोठी वाहवा मिळवली आहे. आजकाल इंटरनेटवरील नेहा कक्करचे व्हिडीओ खूप चर्चेत आहेत. तिची पंजाबी गाणी इंटरनेटवर खूपच लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी नेहा कक्कर आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक पंजाबी गाणे ‘ Khad Tainu Main Dassa ‘ घेऊन आली आहे. तिचे हे गाणे बरेच सुपरहिट ठरले आहे. या गाण्यामध्ये ती तिचा पती रोहनप्रीत सिंगसोबत दिसली आहे. नेहाचे हे गाणे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. या गाण्यामुळे इंटरनेटवर धमाकेदार वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नेहा कक्कर या दिवसांत उत्तराखंडमध्ये सुट्ट्यांच्या घेत आहेत, तिथून तिने आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

(Neha Kakkar perform on song Dil Ko Karaar Aaya see her classical look)

हेही वाचा :

Photo: बोल्ड अँड ब्युटीफूल… ‘टकाटक गर्ल’ प्रणालीच्या साडीतील ‘टकाटक’ अदा

#BoycottKareenaKhan म्हणत नेटकरी ‘बेबो’वर संतापले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.