AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush : महाशिवरात्रीनिमित्त प्रभासची मोठी घोषणा; ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. महाशिवरात्रीनिमित्त प्रभासने या चित्रपटासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित चित्रपट या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी […]

Adipurush : महाशिवरात्रीनिमित्त प्रभासची मोठी घोषणा; 'आदिपुरुष'च्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर
PrabhasImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2022 | 9:03 AM
Share

प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. महाशिवरात्रीनिमित्त प्रभासने या चित्रपटासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित चित्रपट या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर झालं आहे. प्रभासने या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख चाहत्यांना सांगितली. हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ओम राऊत यांनी याआधी अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळे त्यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे.

चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, प्रभास आणि ओम राऊत यांनी मिळून प्रदर्शनाची तारीख ठरवल्याचं कळतंय. संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय या तिघांनी मिळून घेतला. संक्रांतीच्या वेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मोठा जल्लोष असतो. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये पोंगलची धूम असते. संक्रांतीदरम्यानच ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘तान्हाजी’ यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि या चित्रपटांना प्रेक्षक-समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

2023 मध्ये संक्रांतीच्या मुहूर्तावर दुसऱ्या कोणत्या हिंदी, तमिळ किंवा तेलुगू चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही. सर्वांत आधी ‘आदिपुरुष’च्या टीमनेहीच ही तारीख निवडली आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. यासाठी संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सैफ अली खान आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचं कथानक रामायणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या: आदिपुरुष पासून ब्रह्मास्त्रपर्यंत ‘ही’ आहे बिग बजेट पौराणिक चित्रपटांची लिस्ट

संबंधित बातम्या: सैफ अली खान आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे मोशन कॅप्चर सुरू!

संबंधित बातम्या: मराठमोळा शिलेदार करणार प्रभासला दिग्दर्शन, ‘आदिपुरुष’ची घोषणा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.