AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra Case | राज कुंद्राकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, सरकारी वकिलांनी स्पष्ट केले अटकेचे कारण!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील चित्रपट तयार करणे आणि त्याची विक्री करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Raj Kundra Case | राज कुंद्राकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, सरकारी वकिलांनी स्पष्ट केले अटकेचे कारण!
राज कुंद्राचे दोन साथीदार अद्याप मोकाटच
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 12:29 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील चित्रपट तयार करणे आणि त्याची विक्री करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र या बाबतीत त्यांना काही दिलासा मिळेल, असे वाटत नाही. दरम्यान, ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी वकील अरुणा पै (Aruna Pai) यांनी मुंबई उच्च न्यायालयाला अटकेचे कारण स्पष्ट करताना म्हटले की, राज कुंद्रा व्हॉट्सअॅप ग्रुप आणि चॅट्स डिलीट करत असल्याने म्हणजेच या प्रकरणाचे पुरावे नष्ट केले जात असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

19 जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात अटक केली होती, ज्याला त्याच्या वकिलांनी बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. राज कुंद्राची अटक बेकायदेशीर आहे, या युक्तिवादाला उत्तर देताना सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, राज कुंद्राच्या अटकेचे खरे कारण या प्रकरणाचे पुरावे नष्ट करणे हे आहे. राज कुंद्राचे आयटी प्रमुख रायन थोर्पे (Ryne Thorope) यांनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे राज कुंद्राला अटक

अहवालानुसार, अरुणा पै यांनी असेही म्हटले आहे की, मुंबई गुन्हे शाखेने दोन अॅप्सवरून 51 अश्लील चित्रपट जप्त केले आहेत. अहवालांमध्ये ज्या दोन अॅप्सबद्दल बोलले जात आहे ते दोन्ही राज कुंद्राचे आहेत, ज्यांचे नाव ‘बॉलिफेम’ आणि ‘हॉटशॉट्स’ असे आहे. अरुणा पै यांनी असेही सांगितले की, राज कुंद्रा यांच्या वतीने त्यांचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्यासोबत त्यांच्या हॉटशॉट अॅपवर एक ईमेल शेअर केला होता. प्रदीप बक्षी हे लंडनस्थित केनरीन कंपनीचे मालक आहेत.

शिल्पा शेट्टीला क्लिनचीट नाहीच!

27 जुलै रोजी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या राज कुंद्रा तुरुंगात आहे. अश्लील चित्रपट प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली होती. परंतु, पोलिसांना अद्याप या प्रकरणात शिल्पा शेट्टीची कोणतीही भूमिका दिसली नाही. मात्र, शिल्पा शेट्टीला पोलिसांनी अद्याप क्लीन चिटही दिलेली नाही.

सहकारी म्हणतो उगाच गोवण्याचा प्रयत्न!

याशिवाय, या प्रकरणात राज कुंद्राचा सहकारी यश ठाकूरच्या सहभागाचाही पोलीस तपास करत आहे. यश ठाकूर उर्फ ​​अरविंद श्रीवास्तव याच्यावर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अश्लील सामग्री वितरीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. मात्र, यश ठाकूर याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. या अहवालानुसार यश ठाकूर याचे असे म्हणणे आहे की, त्याला विनाकारण या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(Raj Kundra Case Raj Kundra attempt to destroy evidence government prosecutors explained the reason for the arrest)

हेही वाचा :

अभिनेत्री झोयाचा दावा – राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड ऑडिशनची मागणी, सिंगापूरहून आला होता फोन

Nandita Dutta Case: कोलकाता पॉर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफर अटक, नव्या मॉडेल्सचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.