“ती आत्महत्या नाही तर..” सुशांतच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचा चकीत करणारा दावा

आमिर खानचा भाऊ फैजल खान याने सुशांतच्या मृत्यूबाबत धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. फैजलने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे.

ती आत्महत्या नाही तर.. सुशांतच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचा चकीत करणारा दावा
Faisal Khan and SushantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 1:43 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सुशांतच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही त्याच्या मृत्यूशी संबंधित रहस्य उलगडलेलं नाही. सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे. सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते वेळोवेळी त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत. आता नुकताच अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) भाऊ फैजल खान (Faisal Khan) याने सुशांतच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

आमिर खानच्या भावाचा धक्कादायक खुलासा

आमिर खानचा भाऊ फैजल खान याने सुशांतच्या मृत्यूबाबत धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. फैजलने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे.

“मला माहीत आहे की सुशांतची हत्या झाली होती. आता याचा उलगडा होतो की नाही हे येणारा काळच सांगू शकेल. अनेक एजन्सी या कामात गुंतले आहेत आणि त्याचा तपास करत आहेत’, असं तो एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“सत्य लवकरच बाहेर येईल. अनेकदा सत्य समोर येत नाही. पण मी प्रार्थना करेन की सत्य लवकरच सर्वांसमोर येऊ दे आणि सर्वांना त्याबद्दल कळू दे,” असंही तो म्हणाला.

घराणेशाहीवर व्यक्त केलं मत

या मुलाखतीत फैजलने केवळ सुशांतबद्दलच नाही तर बॉलिवूडबद्दल बरंच काही सांगितलं. बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या अस्तित्वाबद्दल त्याने स्पष्ट मत मांडलं. इंडस्ट्रीत हिरोची चांगली इमेज नसल्याबद्दलही तो बोलला. आमिरचा भाऊ फैजल याने ‘मेला’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. मात्र त्यानंतर तो कधीही मोठ्या पडद्यावर दिसला नाही.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.