खरंच रेखा इतक्या वृद्ध दिसतात? काही फोटो पाहिल्यानंतर व्हाल अवाक्
Bollywood’s evergreen actress Rekha: चाहत्यांना फॅशन गोल्स देणाऱ्या रेखा वयाच्या 70 व्या वर्षी खरंच इतक्या वृद्ध दिसतात? काही फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का..., आजही सौंदर्यामुळे चर्चेत असतात रेखा...

Bollywood’s evergreen actress Rekha: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आता बॉलिवूडपासून दूर असल्यातरी आजही त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आजही रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. पण आता रेखा यांचे काही फोटो व्हिडीओ स्वरुपात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर रेखा यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, व्हिडीओमधील फोटो फेक असून फोटो एआयच्या मदतीने तयार केले आहेत.
रेखा यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सक्रिय सुरेश नावाच्या एका युजरने पोस्ट केले आहेत. पोस्टमध्ये रेखा यांचे वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो व्हायरल होत आहे. फोटो रेखा यांचे खरे फटो नाहीत. एआयच्या मदतीने उतार वयात रेखा कशा दिसतील… हे दाखवण्याचा प्रयत्न नेटकऱ्याने केला आहे. पण काही रेखा यांचे काही फोटो असे तयार करण्यात आलेत, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण आहे.




सोशल मीडीयावर रेखा यांचे फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘रेखा इतक्या वृद्ध दिसूच शकत नाहीत…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘रेखा यांच्या वृद्ध होण्याची वाट का पाहात आहात…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘रेखा नाही व्हिडीओमध्ये जया प्रदा दिसत आहेत…’, पोस्टला आतापर्यंत 29 हजार 355 लाइक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण रेखा फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिल्या. आज देखील रेखा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
आज रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, आजही रेखा त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसतात. पण बिग बी यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मौन सोडलं नाही.
रेखा यांचं नाव फक्त अमिताभ बच्चन यांच्यासोबतच नाही तर, अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर रेखा यांनी उद्योजकासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर काही महिन्यात रेखा यांच्या पतीने आत्महत्या केली. आज वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगतात.