AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोटोत ‘बॉयकट’मध्ये दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का? आज आहे सर्वांत यशस्वी अभिनेत्री

या अभिनेत्रीने स्वत:चा हा जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बॉलिवूडची ही आघाडीची अभिनेत्री असून तिने 2000 मध्ये 'मिस इंडिया'चा किताब जिंकला होता. या अभिनेत्रीने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फोटोत 'बॉयकट'मध्ये दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का? आज आहे सर्वांत यशस्वी अभिनेत्री
Priyanka ChopraImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2024 | 12:43 PM
Share

फोटोमध्ये दिसणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? डावीकडच्या फोटोमध्ये टॉम बॉयसारखी दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री असून तिने हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा फोटो त्याच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. एकीकडे 9 वर्षांची असतानाचा हा फोटो आणि दुसरीकडे ‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतरचा फोटो कोलाज करत तिने अत्यंत सुंदर संदेश दिला आहे. ‘स्वत:वर प्रेम करा.. कारण आज तुम्ही जिथे आहात, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही फार मेहनत घेतली आहे’, असं तिने म्हटलंय. त्याचसोबत जुन्या फोटोमधील दिसण्यावरून मला ट्रोल करू नका, असाही इशारा तिने या पोस्टच्या सुरुवातीला दिला आहे.

‘तारुण्य आणि स्वत:च्या दिसण्यात केलेले बदल याचा एखाद्या मुलीवर कितपत परिणाम होऊ शकतो, हा विचारच खूप वेगळा आहे. डावीकडच्या फोटोमध्ये बॉयकट हेअरस्टाइलमध्ये दिसणारी मुलगी मी आहे. शाळेत मोठे केस त्रासदायक ठरतील म्हणून आईने माझा असा हेअरकट केला होता. ‘कटोरी कट’वरून मी थेट अशा लूकमध्ये आले. त्यामुळे एका अर्थी हा माझा विजयच म्हणावा लागेल. उजव्या बाजूला मी 17 वर्षांची असतानाचा माझा फोटो आहे. त्यावेळी 2000 मध्ये मी नुकताच ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. हेअर, मेकअप, वॉर्डरोब यांच्या एका वेगळ्याच विश्वात मी होतो. हे दोन्ही फोटो दहा वर्षांहून कमी अंतरात काढले आहेत. ब्रिटनी स्पिअर्सने अत्यंत स्पष्टपणे म्हटलं होतं की.. मी मुलगी नाही, अद्याप महिलाही नाही. मलासुद्धा एंटरटेन्मेंटच्या मोठ्या विश्वात पाऊल ठेवताना अगदी असंच वाटत होतं’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

यापुढे तिने लिहिलंय, ‘आता 25 वर्षांनंतर मी अजूनही त्याबद्दल विचार करतेय. आपण सर्वजण त्यातच अडकलोय नाही का? अधूनमधून अशा पद्धतीने जेव्हा मी किशोरवयातील स्वत:ला आठवते, तेव्हा माझ्या मनात स्वत:बद्दल आणखी प्रेम आणि दया निर्माण होते. तुम्हीसुद्धा किशोरवयातील स्वत:ला आठवा आणि तिने तुमच्यासाठी किती काय केलंय याचा विचार करा. स्वत:वर प्रेम करा. आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही खूप काही सहन केलंय. तुमच्यातल्या किशोरवयीन व्यक्तीने तुमच्यासाठी काय केलंय ते आठवा.’ हा फोटो आणि खास संदेश बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने पोस्ट केला आहे. तिच्या या फोटो आणि पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.