बाळंतपणाचे मार्केटिंग; प्रेग्नन्सी शुटमधून सेलिब्रिटी कसे कमावतात कोट्यवधी रुपये?

बाळंतपणाचे मार्केटिंग; प्रेग्नन्सी शुटमधून सेलिब्रिटी कसे कमावतात कोट्यवधी रुपये?
प्रेग्नन्सी

काही वर्षांपूर्वी सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य इतका चर्चेचा विषय नव्हते. त्यांची मुलं काय करतात, याविषयी क्षणाक्षणाला सोशल मीडियावर अपडेट येत नसत. | celebrity pregnancy

Rohit Dhamnaskar

|

Jan 25, 2021 | 8:38 PM

मुंबई: सोशल मीडिया म्हणजे जगण्याची मुलभूत गरज असलेल्या सध्याच्या काळात अनेकजण आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यास सतत उत्सुक असतात. सेलिब्रिटी कधी लग्न करतात, त्यांना मुलं कधी होणार, त्यांचं नाव काय असणार अशा प्रत्येक गोष्टीबाबात जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. (celebrity pregnancy photo shoot is big business)

काही वर्षांपूर्वी सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य इतका चर्चेचा विषय नव्हते. त्यांची मुलं काय करतात, याविषयी क्षणाक्षणाला सोशल मीडियावर अपडेट येत नसत. मात्र, सध्याच्या काळात सेलिब्रिटींसाठी प्रेग्नन्सी शूट हादेखील कोट्यवधी रुपये कमावण्याचा राजमार्ग बनला आहे. या प्रेग्नन्सी शूटच्या माध्यमातून सोशल मीडियावर ब्रँडिग आणि प्रमोशन केले जाते. या सगळ्यातून कोट्यवधींची उलाढाल होते.

प्रेग्नन्सी शुटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रँडसमध्ये चढाओढ

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ख्यातनाम कंपन्या प्रेग्नन्सी शुटच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची जाहिरात आणि ब्रँडिंग करतात. एवढंच काय सेलिब्रिटींनी आपण गरोदर असल्याची घोषणा करण्यासाठीही पैसे मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय उत्पादने तयार करणाऱ्या एक कंपन्यांनी 2013 पासून 70 हून अधिक सेलिब्रिटींच्या माध्यमातून प्रमोशन केले आहे.

2019 मध्ये ब्रिटिश मॉडेल इस्करा लॉरेन्स हिने तिच्या प्रियकरासोबत इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले होते. त्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट करणाऱ्या एका कंपनीने इस्करा लॉरेन्सला तब्बल 15 लाख रुपये इतके मानधन दिले होते. या माध्यमातून गर्भधारणेतील अडचणी दूर करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करण्यात आली होती.

करिनाचे हे दोन फोटो पाहा, आई आणि बाळाचं आयुष्य सुरक्षित करा

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे (Kareena Kapoor pregnancy) करिना आठ महिन्यांची गर्भवती आहे. गरोदरपणातील अनेक फोटो करिनाचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिना गर्भावस्थेत फिट राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. करिनाचे नुकताच काही फोटो आणि व्हिडिओ समोर आली आहेत. त्यामध्ये करिना योगा करताना दिसत आहेत करिनाची हे फोटो काही वेळेतच सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहेत. करिना तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर प्रेग्नन्सी काळातील फोटो शेअर करत असते.

अनुष्का शर्मा ‘प्रेगा न्यूज’ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. त्यापूर्वी करिना कपूर खान प्रेगा न्यूजची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होती. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. ‘प्रेगा न्यूज’ ही कंपनी होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या:

करिनाचे हे दोन फोटो पाहा, आई आणि बाळाचं आयुष्य सुरक्षित करा

(celebrity pregnancy photo shoot is big business)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें