Remo D’Souza | नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने सर्जरीनंतर केला ‘डान्स’ तुफान व्हायरल होतोय तो व्हिडिओ

त्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आला होता. आता रेमोची तब्येत हळू हळू सुधारत आहे.

Remo D’Souza | नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने सर्जरीनंतर केला 'डान्स' तुफान व्हायरल होतोय तो व्हिडिओ
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 6:38 PM

मुंबई : नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आला होता. आता रेमोची तब्येत हळू हळू सुधारत आहे. त्याबद्दलची माहिती रेमोची पत्नी लीजेलने दिली आहे. लीजेलने रुग्णालयातील रेमोचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो खुर्चीवर बसून पायावर डान्स करताना दिसत आहे.(Choreographer Remo D’Souza performs ‘dance’ after surgery)

व्हिडिओ शेअर करताना लीझेलने लिहिले आहे की, पायांनी नाचणे वेगळे आणि हृदयातून नाचणे वेगळे तुमच्या प्रार्थना आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. रेमोचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. लीजेलच्या या पोस्टवर वरुण धवनेही कॅमेंट केली आहे. मात्र, रेमोचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि रेमोच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा धक्का आला आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रेमो डिसूझावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात होते. त्याची पत्नी लीजेल त्याच्याबरोबर आहे. रेमो डिसूझा नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्तम नृत्य दिग्दर्शनासाठी आणि ‘फालतू’ आणि ‘एबीसीडी’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यानंतर ते डान्स इंडिया डान्सचे जज होते. यशस्वी नृत्यदिग्दर्शक झाल्यावर दिग्दर्शनासाठीही प्रयत्न केला आणि फालतू चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यानंतर 2013 मध्ये त्यांनी ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटनंतर त्यांनी 2015 मध्ये एबीसीडी 2 प्रदर्शित केला. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होते. कोरिओग्राफी आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनाशिवाय रेमो डिसूझा एक यशस्वी जज देखील आहेत. डान्स इंडिया डान्ससोबतच ते कलर्सच्या शो झलक दिखलाजा आणि स्टार प्लस ‘डान्स प्लस’वर जज म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे.

रेमो डिसूझा यांचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव असे त्याचे खरे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझा यांनी गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. शाळेच्या दिवसांत तो खूप चांगले खेळाडू होते. त्यावेळी त्यांना अनेक मोठे पुरस्कारही मिळाले होते. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. त्यांना ध्रुव आणि गबिरिल हे दोन मुलगे देखील आहेत.

संबंधित बातम्या :

Remo D’Souza | पैशांची फसवणूक, रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल!

Aashram | बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने पाठवली नोटीस!

(Choreographer Remo D’Souza performs ‘dance’ after surgery)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.