वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकलीये लेक…, प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत तेव्हा नक्की काय झालेलं?
अभिनेत्रीचा पहिला सिनेमा आणि आई - वडिलांच्या मनात होती मोठी भीती... लेक वेश्याव्यवसायात तर नाही ना अडकली... अखेर अभिनेत्रीने सांगितलं तेव्हा नक्की काय घडलेलं...

झगमगत्या विश्वास अशा काही घटना घडत असतात, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजते… कुटुंब बॉलिवूडमधील नसलेल्या मुलीने जर अभिनय विश्वात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला… तर आई – वडिलांना मोठी भीती वाटते… असंच काही अभिनेत्री हुमा कुरैशी हिच्यासोबत देखील झालं. सध्या हुमा ‘दिल्ली क्राईम सीझन 3’ मुळे चर्चेत आहे… सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून सर्वत्र सीरिज कौतुक होत आहे. सीरिजमध्ये हुमा हिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हुमा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधून अभिनेत्रीने करीयरची सुरुवात केली… सिनेमातील हुमा हिचं काम पाहिल्यानंतर गोविंग निलहानी यांनी देखील अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं.
पण जेव्हा हुमा कुरेशी हिला पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाली, तेव्हा अभिनेत्रीच्या आई – वडिलांना विश्वास बसला नव्हता… आपल्या मुलीला सिनेमात कोण घेईल… हे नक्कीच वेश्याव्यवसायाचं जाळं असेल… असं हुमा हिच्या आई – वडिलांना वाटलं… हुमा म्हणाली, ‘माझ्या आई – वडिलांना विश्वास बसत नव्हता… त्यांना असं वाटलं मला कशाला आणि का कोणी कास्ट करेल…’
‘माझ्या आई – वडिलांना वाटलं कोणत्या सिनेमाची ऑफर नाही तर, वेश्याव्यवसायाचं जाळ आहे… पण तो सिनेमा कधी तयार झालाच नाही…’ आता जुन्या गोष्टी आठवल्यानंतर हुमा आई – वडिलांना म्हणते, ‘मी काही करु शकते यावर तुमचा विश्वासच नव्हता… माझ्या आई – वडिलांना सांगणं फार कठीण होतं… कारण त्यांच्यासाठी हे विश्व फार वेगळं होतं…’
पहिल्या सिनेमाबद्दल हुमा म्हणाली, ‘मी ऑफिसमध्ये गेले… स्क्रिप्ट वाचली… दुसऱ्या दिवशी मला स्क्रीन टेस्टसाठी सिलेक्ट करण्यात आलं… पण तो सिनेम कधी तयार झालाच नाही… ‘, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हुमा कुरेशी हिची चर्चा रंगली आहे.
हुमा कुरेशी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, आतापर्यंत अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर हुमा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
