TMKOC | ‘हे माँ माताजी…’ जुनी दयाबेन परतणारच नाही! लवकरच होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री!

तारक मेहताचे चाहते गेल्या चार वर्षांपासून दया बेनची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री दिशा वाकानीची आतुरतेने वाट पाहात होते. पण आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे, आमच्या स्त्रोतांच्या माहितीनुसार बर्‍याच चर्चेनंतर दिशा वाकाणीने (Disha Vakani) अखेर या शोला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे.

TMKOC | ‘हे माँ माताजी...’ जुनी दयाबेन परतणारच नाही! लवकरच होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री!
तारक मेहता का उल्टा चष्मा

मुंबई : सोनी सब टीव्हीचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ने (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या दयाबेन या कार्क्रमात दिसत नसली, तरी प्रेक्षक तिची आतुरतेने वाट बघत आहेत. जेठालालचे कुटुंब नेहमी दयाबेनशिवाय अपूर्णच दिसते. तारक मेहताचे चाहते गेल्या चार वर्षांपासून दया बेनची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री दिशा वाकानीची आतुरतेने वाट पाहात होते. पण आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे, आमच्या स्त्रोतांच्या माहितीनुसार बर्‍याच चर्चेनंतर दिशा वाकाणीने (Disha Vakani) अखेर या शोला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच प्रेक्षकांना लवकरच नव्या दया बेनची शोमध्ये एंट्री दिसणार आहे (Dayaben Aka Disha Vakani finally leaves the show).

‘तारक मेहता…’ या कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी आणि नीला टेलीफिल्म्स नेहमीच असे मानत आले आहेत की, या मालिकेतले प्रत्येक पात्र महत्त्वाचे आणि विशेष आहे. म्हणून, सिरियलच्या सेटवर, प्रत्येकाला समान महत्त्व दिले जाते. यापूर्वी सीरियलमधील बऱ्याच कलाकारांनी प्रसूतीसाठी ब्रेक घेतला होता आणि त्यानंतर ते शोमध्ये परतले होते. मात्र, इतर कलाकारांना देण्यात आलेल्या सुविधांपेक्षा वेगळ्या सुविधा देण्यात याव्यात व त्यापेक्षा जास्त सुविधा मिळाव्यात, अशी दिशाची मागणी निर्मात्यांनी फेटाळून लावली आहे.

ब्रेकनंतर काही दिवस केले होते चित्रीकरण!

सुरुवातीला काही चर्चा न झाल्यावर पुन्हा एकदा निर्मात्यांनी दिशा वाकाणीशी बोलण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ती या शोमध्ये परत येऊ शकेल. तिच्या एंट्रीबद्दल योग्य वेळ आणि कथाही लिहिली जात होती. या दरम्यान दिशाने काही दिवस शूट देखील केले होते. या दृश्यात ती आपल्या कुटुंबीयांशी म्हणजेच जेठालाल, मुलगा टप्पू आणि गोकुळधामच्या इतर शेजाऱ्यांशी फोनवर बोलत आहे आणि लवकरच ती गोकुळधाममध्ये परत येईल, असे आश्वासन सर्वांना देत होती. पण आता तसे होताना दिसणार नाहीय (Dayaben Aka Disha Vakani finally leaves the show).

2017मध्ये घेतला मॅटरनिटी ब्रेक

दुर्दैवाने, कोरोनामुळे लॉकडाऊननंतर काही गोष्टींबद्दल निर्माते आणि दिशा वाकाणी यांच्यात झालेले शेवटचे संभाषण निर्णायक ठरले नाही. आणि याच कारणास्तव दिशा वाकाणीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून कायमचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिशा वाकाणीऐवजी नवीन दयाबेन या शोमध्ये प्रवेश करू शकते. दिशा वाकाणीने 2017 मध्ये शोमधून मॅटरनिटी ब्रेक घेतला होता.

दयाबेन साकारण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री उत्सुक

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री राखी विजान हिने दया बेनचे पात्र साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राखी विजान म्हणाली की, मला माहिती आहे की, दिशा वाकाणीने दया बेनचे पात्र खूप चांगल्या प्रकारे साकारले आहे. पण मी माझ्या चाहत्यांना हसवण्यासाठी तयार आहे.

(Dayaben Aka Disha Vakani finally leaves the show)

हेही वाचा :

National Film Awards | वाढदिवसाआधीच मोठी भेट! कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

PHOTO | पडद्यावरच्या ‘सोयराबाईं’चा हा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI