AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’ 900 कोटींच्या पार, कमाई पाहून पाकिस्तानला लागली मिर्ची; थेट केली अशी मागणी

'धुरंधर 2'च्या कमाईचा आकडा 900 कोटींच्या पार पोहोचला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाच्या कमाईबाबत आता ल्यारीच्या रहिवाशांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'धुरंधर 2' 900 कोटींच्या पार, कमाई पाहून पाकिस्तानला लागली मिर्ची; थेट केली अशी मागणी
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2026 | 8:50 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक नवे विक्रम रचले आहेत. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत तब्बल 900 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात पाकिस्तान, कराची आणि ल्यारी यांचाही उल्लेख असल्याने भारताच्या शेजारच्या देशातही त्याची जोरदार आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानमधील लोक चक्क ‘धुरंधर 2’च्या कमाईचा काही भाग देण्याची मागणी करत आहेत. रणवीर सिंहच्या या चित्रपटाच्या कमाईने ल्यारीमधल्या लोकांना मिर्ची लागली आहे. म्हणूनच ते या चित्रपटाच्या कमाईट वाटा मागत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये जेव्हा तिथल्या नागरिकांना ‘धुरंधर 2’च्या जगभरातील कमाईबद्दल प्रश्न विचारला जातो, तेव्हा एक व्यक्ती म्हणते, “माझ्या मते त्यांनी त्यांच्या कमाईतील 80 टक्के ल्यारीला द्यायला हवेत. ते चित्रपट बनवत राहतात, तेच त्यांचं काम आहे. जर एका चित्रपटाने नफा कमावला नाही, तर दुसरा कमावतोच.” तर दुसरा म्हणतो, “त्यांनी आतापर्यंत 800 कोटी रुपये कमावले आहेत. तर किमान त्यांना सांगा की चित्रपटातून जे काही कमावलं आहे, त्या पैशांमधून चील चौका तर रंगवा. त्यांना चील चौकामधील काही प्रेक्षणीय स्थळं दाखवा आणि त्यांचं नुतनीकरण करायला सांगा. ती जागा दाखवूनच त्यांनी पैसे कमावले आहेत. मग किमान त्या जागेचं तरी त्यांनी काही चांगलं केलं पाहिजे.”

पाकिस्तानमधल्या नागरिकांचा हा व्हिडीओ भारतीय चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की ‘धुरंधर’ किंवा ‘धुरंधर: द रिव्हेंज’चं शूटिंग पाकिस्तानमध्ये नाही तर थायलंडमध्ये पार पडलं आहे. आदित्य धरच्या टीमने पाकिस्तानमधल्या ल्यारीसारखाच हुबेहूब सेट थायलँडमध्ये बनवला होता. चील चौकपासून ल्यारीमधील अरुंद गल्ल्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने डिझाइन करण्यात आली होती. बँकॉकमध्ये ल्यारीचा सहा एकर जमिनीवर सेट लावण्यात आला होता.

न्यूजपेपर कटिंग्सच्या मदतीने ल्यारीचा सेट बनवण्यात आला आहे. हा सेट अनेक भारतीय आणि थाई कलाकारांनी मिळवून साकारला आहे. बँकॉकशिवाय भारतातील विविध ठिकाणीही ‘धुरंधर’चा सेट लावण्यात आला होता. लुधियाना, मुंबई, अमृतसर, लेह, लडाख याठिकाणीही त्याची शूटिंग करण्यात आली होती.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.