निर्भयानंतर आता हैद्राबाद बलात्कार प्रकरणावर चित्रपट बनणार

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट (Ram Gopal Varma) बनवले आहेत.

Ram Gopal Varma, निर्भयानंतर आता हैद्राबाद बलात्कार प्रकरणावर चित्रपट बनणार

हैद्राबाद : बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट (Ram Gopal Varma) बनवले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट तयार केले आहेत. त्यानंतर आता राम गोपाल वर्मा हैद्राबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर चित्रपट तयार (Ram Gopal Varma) करणार आहेत.

हा चित्रपट तयार करण्यासाठी राम गोपाल वर्मा यांनी हैद्राबाद विमानतळ पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी शमशाबादचे एसपी एन्काऊंटर मॅन म्हणून प्रसिद्धी मिळवलेले सीसी सज्जनार यांची भेट घेतली. भेट घेऊन वर्मा यांनी बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. जेणेकरुन चित्रपटातील पटकथेत याचा फायदा होईल.

नेमकं हैद्राबाद बलात्कार प्रकरण काय?

28 नोव्हेंबर 2019 रोजी हैद्राबाद येथील टोल नाक्याजवळ एका 26 वर्षीय डॉक्टरचा जळालेला मृतदेह सापडला. चौकीशीनंतर समजले की, महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच दिवशी चारही आरोपींना अटक केली आणि एन्काऊंटर प्रकरणात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राम गोपाल यांचा शेवटचा चित्रपट 2017 मद्ये प्रदर्शित झाला होता. सरकार 3 नंतर राम गोपाल यांनी कोणताही हिंदी चित्रपट बनवला नाबी.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *