दीपिकाची चौकशी संध्याकाळपर्यंत चालणार; ‘हा’ मराठमोळा अधिकारी करणार तपास

ड्रग्जप्रकरणात नाव आल्याने एनसीबीने दीपिका पदुकोणला समन्स पाठवले होते. त्यामुळे तिला आज सकाळी 10 वाजता एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी उपस्थित राह्यचे होते. मात्र, दीपिका 15 मिनिटं आधीच एनसीबी कार्यालयात पोहोचली.

दीपिकाची चौकशी संध्याकाळपर्यंत चालणार; 'हा' मराठमोळा अधिकारी करणार तपास
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 10:35 AM

मुंबई: ड्रग्जप्रकरणाच्या चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण अखेर एनसीबी कार्यालयात पोहोचली असून तिच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी उशिरापर्यंत तिची चौकशी चालणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Deepika Padukone reaches NCB office)

ड्रग्जप्रकरणात नाव आल्याने एनसीबीने दीपिका पदुकोणला समन्स पाठवले होते. त्यामुळे तिला आज सकाळी 10 वाजता एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी उपस्थित राह्यचे होते. मात्र, दीपिका 15 मिनिटं आधीच एनसीबी कार्यालयात पोहोचली. सर्वांना चकवा देत तोंडाला मास्क लावून दीपिका एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. बरोबर 10 वाजता तिच्या चौकशीला सुरुवात झाली. एनसीबीतील मराठमोळे अधिकारी समीर वानखेडे हे दीपिकाची चौकशी करत आहेत.

दीपिकाच्या चौकशीसाठी 35 प्रश्नांची यादी तयार करण्यात आली असून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचीही समीर वानखेडे हेच चौकशी करणार आहेत. सारा आणि श्रद्धा काही वेळातच एनसीबी कार्यालयात पोहोचणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दीपिका रात्रभर झोपली नाही, हॉटेलात थांबली

दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठीच दीपिका हॉटेलमध्ये थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनसीबीकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने रात्रभर तिच्या वकिलांशी चर्चा केली. ती रात्रभर झोपली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Deepika Padukone reaches NCB office)

एनसीबी गेस्ट हाऊसबाहेर बंदोबस्त

दीपिका एनसीबी गेस्ट हाऊसमध्ये येणार असल्यामुळे गेस्ट हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मीडियाने गर्दी करू नये म्हणून गेस्ट हाऊसबाहेर बॅरेकेड्स लावण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पाच अधिकाऱ्यांकडून चौकशी

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एकूण पाच अधिकारी दीपिकाची चौकशी करत आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून तिची चौकशी सुरू झाली असून एनसीबी कार्यालयात ती एकटीच असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दीपिकाला काय प्रश्न विचारले जाणार?

1) करिश्मा प्रकाशची चॅट केलं होतं का? 2) तुम्ही ड्रग्ज घेता का? 3) करिश्माकडून ड्रग्ज मागवले होते? 4) कोको बारमध्ये कोण कोण गेलं होतं? 5) कोको बारमध्ये ड्रग्जचं सेवन केलं का? 6) तुम्ही ड्रग्ज अॅडिक्ट आहात का? 7) एखाद्या ड्रग्ज सप्लायरला ओळखता? 8) कधी एखाद्या पेडलरकडून ड्रग्ज मागवलं? 9) ड्रग्ज वगळता इतर कोणती नशा करता? 10) इंडस्ट्रीमधले ड्रग अॅडिक्ट कोण आहेत? 11) तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपच्या अॅडमिन आहेत का? ज्यात ड्रग्स विषयी चॅट झाले?

&nbsp

संबंधित बातम्या: 

Drugs Case LIVE | दीपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशी सुरु

दीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, ‘हे’ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता

(Deepika Padukone reaches NCB office)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.