Tanhaji : मनोरंजनाचा डबल धमाका, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ आता मराठीतही

अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. (Entertainment double blast, 'Tanhaji The Unsung Warrior' now in Marathi)

Tanhaji : मनोरंजनाचा डबल धमाका, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ आता मराठीतही

मुंबई : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. आता ही वाहिनी प्रेक्षकांसाठी  मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येणार आहे. अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji The Unsung Warrior) हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

तानाजी मालुसरे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव

तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा किल्ला सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच म्हणायला हवी स्टार प्रवाह वाहिनीवर 23 एप्रिलला दुपारी 12 वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

चित्रपटात अनुभवायला मिळणार उत्तम अभिनय, दमदार गाणी, अजय-अतुल संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स 

अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच या चित्रपटात मराठी कलाकारांनी देखील कमालीचं काम केलं आहे. अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे. तेव्हा 23 एप्रिलला दुपारी 12 वाजता ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमाचा मराठीतून आस्वाद घ्यायला विसरु नका.

तानाजी मालुसरे कोण होते ?

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी मित्र होते, तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा सहभाग होता. ते 4 फेब्रुवारी 1970 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईसाठी ओळखले जातात.

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.

संबंधित बातम्या

बाळ हिरावून फसवणूक, रिअल लाईफ ‘कुसुम मनोहर लेले’सोबत घडलेलं भीषण वास्तव काय? ती महिला आज कुठेय?

Dostana 2 : कार्तिक आर्यनच्या एक्झिटनंतर केजोची ‘या’ कलाकारांवर नजर