घरात मृत आई आणि एकटी दोन वर्षांची मुलगी, ‘पिहू’च्या कहाणीची उत्सुकता शिगेला

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार विनोद कापरी दिग्दर्शित पिहू सिनेमा प्रदर्शित व्हायला केवळ सहा दिवस उरलेत. पण प्रेक्षकांना सहा दिवस वाट पाहणंही कठीण झाल्याचं दिसतंय. त्याला कारणही तसंच आहे. अवघ्या दोन वर्षाच्या मुलीची एकमेव भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे एक विलक्षण अनुभव असणार आहे. मृत आई आणि बापाविना घरात एकट्या असलेल्या या मुलीसोबत नेमकं घडतं तरी […]

घरात मृत आई आणि एकटी दोन वर्षांची मुलगी, 'पिहू'च्या कहाणीची उत्सुकता शिगेला
सचिन पाटील

| Edited By: SEO Team Veegam

Feb 15, 2020 | 6:12 PM

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार विनोद कापरी दिग्दर्शित पिहू सिनेमा प्रदर्शित व्हायला केवळ सहा दिवस उरलेत. पण प्रेक्षकांना सहा दिवस वाट पाहणंही कठीण झाल्याचं दिसतंय. त्याला कारणही तसंच आहे. अवघ्या दोन वर्षाच्या मुलीची एकमेव भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे एक विलक्षण अनुभव असणार आहे. मृत आई आणि बापाविना घरात एकट्या असलेल्या या मुलीसोबत नेमकं घडतं तरी काय याची उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे.

घरात एकटी असलेल्या एका दोन वर्षांच्या चिमुकलीसोबत काय काय घडू शकतं याची झलक दाखवणारा ‘पिहू’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलर आल्यापासून हा चित्रपट कधी रिलीज होतो याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र त्याआधी गोव्याच्या ‘इफ्फी’मध्ये आणि शुक्रवारी झालेल्या प्रेस स्क्रिनिंगमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाने त्याचं तोंडभरुन कौतुक केलंय.

ज्येष्ठ पत्रकार विनोद कापरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. अवघ्या दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्माने यात प्रमुख आणि एकमेव भूमिका केली आहे.

मायराच्या नैसर्गिक अभिनयाने मंत्री महोदयांनाही चकीत करुन सोडलंय. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत आणि सध्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी झालेल्या प्रेस स्क्रिनिंगला उपस्थिती लावली आणि पिहूची त्यांच्यावर चांगलीच भुरळ पडली.

इतकंच नव्हे तर जागतिक कीर्तीचे इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनीही पिहूचं कौतुक केलं.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच पिहूचं जगभरात कौतुक होतंय. त्याच्या ट्रेलरला दिवसेंदिवेस लाखोंनी व्हयुज मिळत आहेत. घरात एकट्या असलेल्या पिहूचं नेमकं होतं तरी काय? तिला कोणाची मदत मिळते की नाही? तिच्या आईचा मृत्यू नेमका कशाने होतो? असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी येत्या 16 तारखेला थिएटरमध्ये जावं लागेल.

‘पिहू’चा ट्रेलर


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें