रणवीर आणि आलियाच्या ‘गली बॉय’ ची ऑस्करसाठी निवड

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी (Oscar award 2019) भारताकडून 'गली बॉय' या सिनेमाची निवड करण्यात आली आहे.

रणवीर आणि आलियाच्या 'गली बॉय' ची ऑस्करसाठी निवड
Follow us
| Updated on: Sep 21, 2019 | 8:17 PM

मुंबई : ‘अपना टाईम आयेगा’ असं म्हणतं सर्वच रॅप बनवणाऱ्या तरुणांच्या गळयातील ताईत बनलेला चित्रपट म्हणजे गली बॉय… हा चित्रपट (Gully Boy enter in Oscar) प्रदर्शित होऊन सात महिने उलटले असले, तरी या चित्रपटाची  जादू (Gully Boy enter in Oscar) अद्याप सिनेरसिकांच्या मनातून उतरलेली नाही. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी (Oscar award 2019) भारताकडून ‘गली बॉय’ या सिनेमाची निवड करण्यात आली आहे.

धारावीच्या झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या एका प्रसिद्ध रॅपरची कथा यात दाखवण्यात आली आहे. यात अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh gully boy) आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते. दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाला रसिकांना अक्षरश: डोक्यावर घेतलं होते. तर सिनेसमीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते.

‘गली बॉय’ (Gully Boy) चित्रपटाला मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

या चित्रपटात रणवीरने दमदार अभिनय केला होता. हा चित्रपट बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही चांगलाच गाजला होता. हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथने रणवीर सिंहच्या अभिनयाचे कौतुक केले होते. या चित्रपटाची पटकथा झोया आणि रिमा कागतीनं लिहिली आहे.

रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या डिव्हाइन म्हणजेच विवियन फर्नांडिस आणि रॅपर नॅझी म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन गली बॉय हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यात रणवीरने मुराद नावाच्या एका रॅपरची भूमिका साकारली आहे. या  चित्रपटाची कथा मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीतुन सुरु होेते. मुराद गरीबी आणि समाजातील बहिष्कार सहन करत असतो. वडिलांचं सतत टोचून बोलणं; आई-वडिलांची सतत होणारी भांडणं, यामुळे कुढत जीवन जगत असलेल्या मुरादचं स्वप्न मोठा रॅपर बनण्याचं असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुरादची गर्लफ्रेंड सैफिना (आलिया भट्ट) त्याला मदत करते आणि मुराद एक उत्तम रॅपर बनतो. या कथानकावर हा चित्रपट साकारण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.