AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh : ‘हनुमान अंश’ पाहण्यासाठी आलेल्या मुस्लीम व्यक्तीने हे काय केलं? चप्पल काढून बसला अन्…, व्हिडीओ व्हायरल

Hanuman Ansh Viral Video: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'हनुमान अंश' सिनेमाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा उत्तम कमाई करत असताना, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका मुस्लीम व्यक्तीचा हा व्हिडीओ आहे...

Hanuman Ansh : 'हनुमान अंश' पाहण्यासाठी आलेल्या मुस्लीम व्यक्तीने हे काय केलं? चप्पल काढून बसला अन्..., व्हिडीओ व्हायरल
Hanuman Ansh
| Updated on: Sep 04, 2026 | 7:54 AM
Share

Hanuman Ansh Viral Video: नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने 50 कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे. सिनेमाला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात मोठी गर्दी करत आहे. सिनेमा पाहणाऱ्या एका प्रेक्षकाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधंल आहे. सांगायचं झालं तर, एक मुस्लीम वृद्ध व्यक्ती ‘हनुमान अंश’ सिनेमा पाहण्यासाठी आलेला.

त्या वृद्ध व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण सिनेमा पाहत असताना त्याने स्वतःची चप्पल देखील काढून ठेवलेली. सध्या त्या मुस्लीम व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्यक्तीने पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला असून पांढऱ्या रंगाची टोपी देखील घातली आहे. व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कोणतंही राजकारण नसलेलं भारत…’, दुसरं नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘राजकीय ध्रुवीकरणाच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांमुळे त्याचे मन दूषित झाले नाही.’, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा सिनेमा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे; त्यांच्यावरील लोकांची श्रद्धा किती अढळ आहे, हे ‘मिराज सिनेमाज’ने त्यांच्यासाठी चित्रपटगृहात एक आसन रिकामे ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून दिसून येते. ‘मिराज सिनेमाज’ने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे जाहीर केलं की, त्यांनी नीम करोली बाबांसाठी 9 क्रमांकाचं आसन राखीव ठेवलं आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन…

रिपोर्टनुसार, सुमारे 1.8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘हनु-मॅन’ या सिनेमाने भारतात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 10 लाख रुपयांची कमाई केली. 28 व्या दिवसापर्यंत या सिनेमाने 62 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादांमुळे या सिनेमाचं चित्रपटगृहांमधील प्रदर्शन अजूनही सुरू असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी