रेल्वेची पहिली 'प्रमोशन ऑन व्हील्स' ट्रेन, 'हाऊसफुल-4' चं हटके प्रमोशन

आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेने 'प्रमोशन ऑन व्हील्स' ही स्कीम सुरु केली आहे (Indian Railway Promotion On Wheels). या अंतर्गत सिनेमाचं प्रमोशन, जाहिराती आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ही विशेष रेल्वे बुक केली जाऊ शकते. या स्कीमची सुरुवात अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा 'हाऊसफुल-4' च्या प्रमोशनने झाली (Housefull-4).

रेल्वेची पहिली 'प्रमोशन ऑन व्हील्स' ट्रेन, 'हाऊसफुल-4' चं हटके प्रमोशन

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वे तोट्यात आहे. तोट्यात असूनही प्रवाशांना अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वे करत आहे. मात्र, रेल्वेने आता आपला तोटा भरुन काढण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे (Indian Railway Promotion On Wheels). रेल्वेने सिनेमांच्या प्रमोशनच्या माध्यमातून तोटा भरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेने ‘प्रमोशन ऑन व्हील्स’ ही स्कीम सुरु केली आहे (Indian Railway Promotion On Wheels). या अंतर्गत सिनेमाचं प्रमोशन, जाहिराती आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ही विशेष रेल्वे बूक केली जाऊ शकते. या स्कीमची सुरुवात अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा ‘हाऊसफुल-4’ च्या प्रमोशनने झाली (Housefull-4).

यावेळी या रेल्वेमध्ये अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेता बॉबी देओल, अभिनेत्री क्रिती सनन, अभिनेत्री पूजा हेगडे, अभिनेत्री क्रिती खरबंदा, अभिनेता चंकी पांडे, अभिनेता जॉनी लिव्हरसोबत ‘हाऊसफुल-4’ ची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.

या प्रवासादरम्यान, या फन राईडमध्ये सर्वच कलाकारांनी धमाल केली. त्यांनी त्यांच्या रेल्वे प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. पत्रकारांसोबत मज्जा केली, गाण्याच्या भेंड्या खेळल्या. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने सर्वांचं मनोरंजन केलं. तसेच, अक्षय कुमारने ‘हाऊसफुल-4’ या सिनेमाबाबत माहिती दिली.

या प्रवासादरम्यान, अक्षयसह सगळी टीम मीडिया कर्मींसह हौसी गेम खेळली. यामध्ये भरघोस बक्षिसांची लूट करण्यात आली. फुल्ल हौसी जिंकणाऱ्याला 32 इंचाचा टीव्ही बक्षिस देण्यात आला. तर इतर विजेत्यांना पॉवर बँक, म्युझिक सिस्टम, हार्ड ड्राईव्ह अशा स्वरुपात बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या विशेष प्रवासादरम्यान सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेलं ‘हाऊसफुल-4’ सिनेमातील अक्षय कुमारच्या ‘बाला’ या गाण्यावर डान्सही केला.

रितेशने हा प्रवास विस्मरणीय असल्याचं म्हंटलं. तर अक्षयने हा भारतीय रेल्वेचा स्तुत्य उपक्रम असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

भारतीय रेल्वेची 8 डब्ब्यांची ही विशेष ‘प्रमोशन ऑन व्हील्स’ रेल्वे मुंबई ते दिल्ली धावणार आहे. मुंबई ते दिल्ली हा प्रवास व्हाया राजस्थान, गुजरात, उत्तराखंड असा होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *