चित्रपटात कसे चित्रित केले जातात इंटीमेट सीन? कोणत्या गोष्टींची घेतली जाते काळजी?, जाणून घ्या या बद्दल अधिक…

सुरुवातीच्या काळात चित्रपटातील काही दृश्यांवर मर्यादा होत्या. पण, चित्रपटात थेट चुंबन दृश्य चित्रीत केली जात नव्हती. मग, काळानुसार असे सीन चित्रपटात दिसू लागले. (How are intimate scenes portrayed in a movie? What is taken care of ?, Learn more about this ...)

चित्रपटात कसे चित्रित केले जातात इंटीमेट सीन? कोणत्या गोष्टींची घेतली जाते काळजी?, जाणून घ्या या बद्दल अधिक...

मुंबई : प्रेम आणि रोमांस (Romance) ज्या प्रकारे आपल्या जीवनाचा एक भाग आहे, त्याचप्रमाणे तो चित्रपट (Movies) आणि मालिकांचाही (Serial) एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. एक काळ असा होता की, पुरुषच चित्रपटात स्त्रियांच्या भूमिका साकारत असत. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये ‘अभिनेत्री’ आल्या. तथापि, त्याकाळी चित्रपटातील काही दृश्यांवर मर्यादा होत्या. पण, चित्रपटात थेट चुंबन दृश्य चित्रीत केली जात नव्हती. मग, काळानुसार असे सीन चित्रपटात दिसू लागले.

आपण एखादा जुना चित्रपट पाहिल्यास, नायक आणि नायिका यांच्यात काहीतरी घडून येताच कॅमेरा काळोख, दिवा, भिंत किंवा दोन फुलांवर लक्ष केंद्रित करतो किंवा त्या खोलीत पूर्ण अंधार पडतो. एकंदरीत या गोष्टींबद्दल पूर्वी खूप काळजी घेण्यात आली होती. पण आजच्या चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन ही काही मोठी गोष्ट नाही. विशेषत: ओटीटी आणि वेबसीरीजचा काळ आला आहे तेव्हापासून हा मोकळेपणा खूप वाढला आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्म केवळ अशाच सामग्रीसाठी ज्ञात आहेत.
अनेकदा लोकांना असा प्रश्न पडतो की, इंटिमेट सीन्स चित्रपटात कसे शूट केले जातात? आपण लहान आणि मोठ्या पडद्यावर जे पहात आहोत, अर्थात किसिंग सीनपासून ते बेड सीनपर्यंत, अगदी त्याच प्रकारे शूट केले जातात का?
क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तींचे असे म्हणणे आहे की, असे अंतरंग दृश्य देखील त्यांच्या अभिनयाचा एक भाग असतात. परंतु, बर्‍याच प्रकारचे प्रश्न सामान्य लोकांच्या मनात पिंगा घालत असतात. या प्रश्नांसंदर्भात आम्ही चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील पडद्यामागील व्यक्तींशी बोललो आणि त्यादरम्यान आम्हाला इंडस्ट्रीच्या एका नव्या उपक्रमाबद्दलही माहिती मिळाली…

जेव्हा अभिनेत्रीने इंटिमेट सीन्स करण्यास नकार दिला होता?

साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हिने नुकताच रणदीप हुड्डा सोबत ‘दो लफ्जों की कहानी’ चित्रपटात चुंबन देण्यास नकार दिला होता. शूटिंग दरम्यान, दिग्दर्शक दीपक तिजोरी अ‍ॅक्शन बोलताच रणदीप पुढे आला, मात्र काजलने मागे जात लिप-लॉक सीन देण्यास नकार दिला. त्यानंतर नंतर दीपकने चित्रपटाची आणि स्क्रिप्टची मागणी पटवून देत तिचे मन वळवले.
आता अलिकडच्या काही महिन्यांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या वेब सीरीज पाहिल्या, तर त्यांच्यात शारीरिक किंवा लैंगिक संबंधांची दृश्य अति सामान्य झाली आहेत. ‘पार्चेड’, ‘बीए पास’ सारख्या बॉलिवूड चित्रपटातही असे देखावे पाहिले गेले आहेत. पण आपल्याला पडद्यावर दिसते त्याचप्रमाणे सर्व काही घडते का?

ब्युटी शॉट्ससह भ्रम निर्माण करणे!

इमरान हाशमी स्टारर फिल्म ‘व्हाय चीट इंडिया’ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक रुद्रभानू प्रताप सिंह, आपला 4 वर्षांचा अनुभव सांगताना म्हणाले की, त्या दिवसांत ते फायर फाइल्सचे क्रिएटिव्ह हेड होते, त्यानंतर हॉरर + सेक्स… ‘होरेक्स’ सुरू झाले. त्याच्या एका भागामध्ये, अभिनेत्रीने क्लीवेजजवळ चुंबन असा एक सीन नाकारला, कारण तिच्या होणाऱ्या नवऱ्याने नकार दिला होता. अशा परिस्थितीत क्रिएटिव्ह टीमला त्याचा भास निर्माण करावा लागला. ब्युटी शॉट्सने काम करावे लागले, छायांकन करण्याच्या काही तंत्रांचा उपयोग करावा लागला. जेणेकरून काहीही न घडताही, प्रेक्षकांना असं वाटतं की, तिथे बरेच काही घडले आहे.

मिठी मारणे, किस करणे, हातांनी स्पर्श करणे आणि नंतर कॅमेरा अँगल असा ठेवणे की, ज्यामुळे शरीराचा काही भाग झाकून ठेवता येतो, यालाच ब्युटी शॉट्स म्हणतात. ही सर्व कॅमेरा तंत्रे आहेत. या दरम्यान कपड्यांची काळजी घ्यावी लागते. बेड सीन करण्यासाठी 2 किंवा 3 कपडे देणे, जेणेकरून तो सीन करतना तो क्षण तयार होईल. यासाठी बेडवर सॅटिन बेडशीट्स वापरली जातात आणि त्याचे आवरण बनवून केवळ भ्रम निर्माण केला जातो.
या भासदृश्याविषयी विचारले असता, रुद्रभानू म्हणतात, “वर शाहरुख खान आणि कतरिना कैफचा जो फोटो आपण पाहत आहात तो 2012 मधील फिल्म ‘जब तक है जान’मधील आहे. यात एक असे दृश्य आहे की, दोघेही कपड्यांशिवाय एकमेकांच्या भोवती बेटशीट गुंडाळून बसलेले दाखवण्यात आले आहे. शूटिंगच्या वेळी असे घडले नसले तरी हा केवळ एक भ्रम आहे.”

हिरव्या भाज्यांना केले जाते कीस

वेब सीरीज आणि सिरियल्ससाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम करणारे जॉय बॅनर्जी, सध्या ‘वी द पीपल फिल्म्स’ नावाचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस चालवत आहेत. ते असं म्हणतात की, एखादी असुविधाजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आपण पुन्हा जुन्या काळात जातो. आम्ही जुन्या काळाप्रमाणे क्रोमा शॉट्स घेतो. क्रोमा म्हणजे निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कोणतेही आवरण, जे नंतर बदलले जाते.

उदाहरणार्थ, जर अभिनेता आणि अभिनेत्रीचा किसिंग सीनवर आक्षेप असेल, तर त्या दरम्यान त्यांच्यामध्ये हिरवा भोपळा ठेवला जातो. हिरवा रंग असल्याने तो क्रोमचे कार्य करते. दोघांनीही हा लीप लॉक सीन केला की, नंतर पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान, हा हिरवा भोपळा अदृश्य केला जातो आणि प्रेक्षकां असे वाटते की दोघांनीही किस केले आहे.
आपल्याला वाटते की इंटीमेंसी झाली, परंतु ..

संभाषण दरम्यान, आम्हाला हिंदी चित्रपटांची पहिली इंटीमेसी कोऑर्डिनेटर आस्था खन्नाबद्दल माहिती मिळाली, जी बॉलिवूडमधील इंटीमेसी दृश्यांचे संयोजन करत आहेत. बॉलिवूडमध्ये या प्रकारच्या कामाचा ट्रेंड नव्हता, परंतु आस्थाने याद्वारे आपली ओळख निर्माण केली. यासाठी त्यांनी अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील इंटिमॅसी प्रोफेशनल्स असोसिएशनकडून इंटिमॅसी कोऑर्डिनेशनचा कोर्स पूर्ण केला आहे.

आस्था ‘अंधाधुन’, ‘बदलापूर’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तिला असे वाटते की, अ‍ॅक्शन सीन्सच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच या दृश्यांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे असावीत. जर्मन वेबसाईट ड्यूश वेलेला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते की, प्रेक्षकांना असे वाटते की संभोग झाला आहे, परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही.
आस्था म्हणाली, “कारण यासंदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे त्यांचे पालन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण काही मूलभूत गोष्टी आहेत. यासाठी आम्हाला दोघांमध्ये काही अडथळे निर्माण करावे लागतात. दृश्यांवर दोघांशीही चर्चा करावी लागते. अशी एक सीमा असते, जी ओलांडली जाऊ नये. तथापि, बॉलिवूडमध्ये एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलेल्या अभिनेत्री-अभिनेत्रींवर बरेच काही अवलंबून आहे.

ले गार्ड, उशी आणि सिलिकॉन पॅड्ससारख्या प्रॉप्सचा वापर

आस्था सांगते की, तांत्रिक टीमप्रमाणेच तिच्याकडेही काही प्रॉप्स आहेत. सॅनिटरी पॅड, बॉडी टेप, अल्कोहोल पिशव्या सामान्य आहेत. परंतु, मुख्यत: पुरुष व स्त्री यांचे खाजगी भाग एकमेकांना स्पर्श करू नये, याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी, क्रिकेटर्सप्रमाणे पुरुष अभिनेत्यांसाठीही गार्ड असतात. तेथे एक उशी किंवा एअर बॅग असते], जी दोघांदरम्यान अंतर ठेवते. अभिनेत्रीसाठी पुशअप पॅड्स, जर मागून टॉपलेस दाखवायचे असेल तर, समोर लावण्यासाठी सिलिकॉन पॅड्स असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संमती. कोणत्याही इंटीमेसी दृश्यासाठी त्या कलाकारांची संमती आवश्यक असते.
किती कम्फर्टेबल आहात हे करारामध्ये नमूद केले जाते!

इंटीमेसी दृश्यांसाठी कलाकारांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करार करावा लागतो. कधीकधी करारात या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. मुंबईकर अभिनेता संजय म्हणतो की, यामुळे त्याच्या हातून काही ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मालिका गेल्या आहेत. तो म्हणतो की, जेव्हा नवख्या कलाकारांकडून डिमांड आणि प्रोग्रेसिव्हनेसच्या नावाखाली काही गोष्टी करवून घेतल्या जातात, तेव्हा समस्या निर्माण होतात. याविषयी सांगताना ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहिल यांनी कलाकारांसमवेत या दृष्यावर चर्चा करण्याची व त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग ठेवण्याचा सल्ला दिला होता. अभिनेता म्हणून ही भावना असह्य असते.

आऊटपुट महत्त्वाचे

सलमान खान, सनी देओल आणि करिश्मा कपूर स्टारर ‘जीत’ मधील अभिनेत्रीची हॉट फिगर दाखवण्यासाठी पॅड वापरण्यात आले. मुंबईतील अभिनेत्री शनाया सिंग यांनी सांगितले की, साडीमध्ये मादक / बोल्ड दिसण्यासाठी पॅड्स वापरले जातात. मादक दिसण्याबरोबरच आऊटपुट मिळण्यासाठी हा सुवर्णमध्य साधला जातो. मात्र, एखादी अभिनेत्री यावर सहमत नसेल, तर केवळ हेच कारण दाखवून तिला कामावरून काढून टाकणे योग्य नाही.

कथेची मागणी आऊटपुटवर अवलंबून असावी. हे संभोग न करता देखील दाखवले जाऊ शकते. यासाठी तंत्र आणि सौंदर्य देखावे वापरा. आपण प्रेक्षकांना जे हवे आहे ते आउटपुट आणा, परंतु सुवर्णमध्य शोधा. अभिनेत्री किंवा कलाकारांना कम्फर्टेबल करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे.

अ‍ॅक्शन सीनप्रमाणे बॉडी डबलचा वापर

जॉय सांगतात की, बर्‍याच अभिनेत्री चुंबन किंवा स्मूचसाठी तयार असतात, पण त्यांना ते असुविधाजनक वाटते किंवा नंतर त्या या दृश्यांना नकार देतात, अशा परिस्थितीत बॉडी डबलचा वापर केला जातो. सलमान किंवा अजयच्या अ‍ॅक्शन फिल्म पाहताना तिथे त्यांचा चेहरा दिसला की नायक स्वतः तिथे आहे,असे वाटते. पण अ‍ॅक्शन सीन्स त्यांचे बॉडी डबल करत असतात. इथेही तसेच घडते. जिथे चेहरा दिसतो, तिथे अभिनेत्री असते आणि जिथे इंटीमेसी सीन आहेत, तिथे तिच्या सारखे दिसणारे डुप्लिकेट कलाकार असतात.

कमीतकमी लोकांची उपस्थिती

आस्था, रुद्रभानू, संजय आणि जॉय यांच्याशी साधलेल्या या संवादावरून असे दिसून येते की, इंटीमेसी सीन दरम्यान किमान लोकांची उपस्थिती असते. कलाकार बर्‍याच लोकांच्या उपस्थितीत कम्फर्टेबल नसतात. अशा परिस्थितीत तेथे फक्त संचालक, डीओपी आणि अत्यंत महत्वाचे क्रू मेंबर उपस्थित असतात. कधीकधी दिग्दर्शक देखील बाहेर जातात आणि शूटनंतर तो व्हिडीओ पाहतात आणि त्यात बदल आणू इच्छित असल्यास हस्तक्षेप करतात. या सर्वांचाच असा विश्वास आहे की, जर इंडस्ट्रीमध्ये मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली तर चित्रपट निर्मात्यांकडून त्यांची कथा योग्य मार्गाने मांडण्याची शक्यताही वाढेल.

संबंधित बातम्या

Photo : अंशुला कपूर हिंदुजा रुग्णालयात दाखल, भेटीला पोहोचले जान्हवी आणि बोनी कपूर

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI