AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIFA Awards 2024: बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा बोलबाला, हॉलिवूडकडे ‘बादशाह’ का फिरवतो पाठ? कारण समोर

IIFA Awards 2024: आयफा पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान याचा जलवा, बॉलिवूडमध्ये किंग खानचा बोलबाला, पण हॉलिवूडकडे बादशाह का फिरवतो पाठ? अखेर कारण समोर, सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल

IIFA Awards 2024: बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा बोलबाला, हॉलिवूडकडे 'बादशाह' का फिरवतो पाठ? कारण समोर
| Updated on: Sep 29, 2024 | 10:24 AM
Share

IIFA Awards 2024: अबु धाबी याठिकाणी सध्या सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळत आहे. ‘आयफा अवॉर्ड 2024’ साठी बॉलिवूड सेलिब्रिटी एकाच छताखाली आहेत. पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यंदाच्या वर्षी पुरस्कार सोहळा अभिनेता शाहरुख खान होस्ट करत आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. यंदाच्या वर्षी शाहरुख खान आणि अभिनेता विकी कौशल यांनी पुस्कार सोहळ्याच्या होस्टची भूमिका निभावली आहे. शिवाय दोघांनी दमदार डान्स देखील केला आणि एकमेकांसोबत विनोदी अंदाजात पुरस्कार सोहळा होस्ट केला.

हॉलिवूड सिनेमे का नाही करत शाहरुख खान?

शाहरुख खान कायम त्याच्या स्पष्ट वक्तव्याने स्वतःचं मत मांडत असतो. आता हॉलिवूड सिनेमे का नाही करत? यामागचं कारण देखील अभिनेत्याने विनोदी अंदाजात दिलं आहे. ‘मी हॉलिवूड सिनेमे करत नाही. कारण मी स्वतःला आऊटसायडर मानतो.’ पुढे विकी याची खिल्ली उडवत किंग खान म्हणतो, ‘मी इतर नेपो किड्स प्रमाणे नाही. मी स्वतःला बाहेरचा मानतो.’

View this post on Instagram

A post shared by IIFA Awards (@iifa)

एवढंच नाही तर, शाहरुख खान याने विकी याला इंडस्ट्रीचा लहान मुलगा देखील म्हटलं आहे. शिवाय दोघांनी एकत्र डान्स देखील केला. आयफाच्या ऑफिशिल इन्स्टाग्रामवर शाहरुख आणि विकीचे अनेक फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by IIFA Awards (@iifa)

शाहरुख खान हॉलिवूड सिनेमा करण्यास नकार दिला. पण बॉलिवूडमध्ये शाहरुख याचा बोलबाला आहे. ‘झीरो’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खान याने चार वर्षांनंतर ‘पठाण’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. ‘पठाण’ सिनेमानंतर ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमातून किंग खान याने चाहत्यांची मने जिंकली.

‘आयफा अवॉर्ड 2024’ मध्ये सेलिब्रिटींचा बोलबाला

‘आयफा अवॉर्ड 2024’ मध्ये विकी कौशल, अनन्या पांडे, कृती सनॉन, यांनी दमदार परफॉर्मेंस केला. वयाच्या 69 व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी डान्स केला. रेखा यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.