‘मला भक्त म्हणतील, पण पंतप्रधान मोदी येताच…’, कंगना रनौत हिच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या अनेकांच्या नजरा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं काय म्हणाली कंगना रनौत? कारण जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा... कायम वादाचा मुकूट डोक्यावर घेऊन कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

'मला भक्त म्हणतील, पण पंतप्रधान मोदी येताच...',  कंगना रनौत हिच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या अनेकांच्या नजरा
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 8:40 AM

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. आता देखील कंगना हिची एक पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. यावेळी अभिनेत्री कंगना रनौत हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. यामागे कारण देखील खास आहे. कंगना हिने वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर एक पोस्ट केली आहे. वर्ल्ड कप पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील फायनल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले. यावर कंगना हिने एक पोस्ट केली आहे. सध्या कंगना हिच्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण मला भक्त म्हणतील. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे मोदी स्टेडियममध्ये पोहोचताच गेम पलटला…’ यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रंगना रनौत हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा…

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, वर्ल्ड कप पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले होते. शाहरुख खान, रणवीर सिंग, आयुष्मान खुराना, आर्यन खान, गौरी खान, सुहाना खान, दीपिका पादुकोण, विवेक ओबेरॉय यांसारखे अनेक सेलिब्रिटी सामना पाहण्यासाठी पोहोचले होते.

कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे

कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच अभिनेता आर माधवन याच्यासोबत एका सिनेमात दिसणार आहे. ज्याच्या शूटिंगसाठी अभिनेता सध्या चेन्नईत आहे. नुकताच त्याने सेटवरील फोटो शेअर केले आहेत. पण सिनेमाच्या शिर्षकाबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

कंगना कायम चालू मुद्द्यांवर स्वतःचं स्पष्ट मत मांडत असते. आता देखील तिने वर्ल्ड कप फायनलनंतर पोस्ट केली आहे. सोशल मीडिया पोस्ट आणि सडेतोड वक्तव्यांमुळे अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. कंगना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे कंगना हिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. कायम वादाचा मुकूट डोक्यावर घेऊन कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Non Stop LIVE Update
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.