मला इच्छा मृत्यू द्या, म्हणणाऱ्या जयश्रीचा घरात मृतदेह आढळला

मला इच्छा मृत्यू द्या, म्हणणाऱ्या जयश्रीचा घरात मृतदेह आढळला

कन्नड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नडची माजी स्पर्धक जयश्री रमैया मृतावस्थेत घरात आढळली आहे (kannada actress jayashree ramaiah found dead at rehabilitation center)

चेतन पाटील

|

Jan 25, 2021 | 4:17 PM

बंगळुरु : कन्नड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नडची माजी स्पर्धक जयश्री रमैया मृतावस्थेत घरात आढळली आहे. तिचा मृतदेह पंख्याला गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळला. जयश्री गेल्या काही दिवसांपासून नैराश्याशी झुंजत होती. बंगळुरुच्या संध्या किरण आश्रमात तिच्यावर उपचार सुरु होते. जयश्री बिग बॉस सिझन तीनची स्पर्धक होती. तिने अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्याने कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे (kannada actress jayashree ramaiah found dead at rehabilitation center).

जयश्रीने आज सकाळपासून (25 जानेवारी) आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबियांचे मेसेज आणि फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिच्या मित्रांनी आश्रमाशी संपर्क केला. आश्रमातील काही सदस्य जयश्रीच्या खोलीत तिच्या तपासासाठी गेले तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर आश्रम प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

जयश्री गेल्या काही दिवसांपासून काम न मिळाल्याने नैराश्यात असल्याती माहिती समोर येत आहे. तिने एकदा फेसबुक लाईव्ह केलं होतं. या फेसबुक लाईव्ह दरम्यान तिने “आपण आणखी जास्त नैराश्याचा सामना करु शकत नाही”, असं ती म्हणाली होती. त्याचबरोबर “मला इच्छा-मृत्यू पाहिजे”, असंदेखील जयश्री म्हणाली होती.

जयश्रीने गेल्यावर्षी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये तिने स्वत:च्या मानसिक अडचणी सविस्तरपणे सांगितल्या होत्या. “माझी आर्थिक स्थिती मजबूत आहे. पण मी नैराश्यात आहे. मी माझ्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक गोष्टींशी झुंजत आहे. माझी लहानपणापासून फसवणूक झाली आहे”, असं जयश्री गेल्यावर्षी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाली होती.

जयश्रीने नुकतंच एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. या लाईव्हमध्ये तिने लोकांना तिच्याविषयी चर्चा करु नका, असं सांगितलं होतं. “मी एक पराभवी महिला आहे, जिला इच्छा-मृत्यूची आवश्यकता आहे. आता मी फक्त त्याचीच आशा करत आहे. मी एक चांगली मुलगी नाही. प्लीज मला इच्छा मृत्यू द्या”, असं जयश्री म्हणाली होती (kannada actress jayashree ramaiah found dead at rehabilitation center).

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें