अभिषेक -करिश्माची लव्हस्टोरी कशी झाली सुरू ? बहिणीमुळे वाढली जवळीक पण…

अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तर अभिषेक बच्चन हाही नेहमी चर्चेत असतो. बच्चन आणि कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात. करिश्मा आणि अभिषेक यांचं नातंही नेहमीच चर्चेत होतं.

अभिषेक -करिश्माची लव्हस्टोरी कशी झाली सुरू ? बहिणीमुळे वाढली जवळीक पण...
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 9:43 AM

अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तर अभिषेक बच्चन हाही नेहमी चर्चेत असतो. बच्चन आणि कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात. करिश्मा आणि अभिषेक यांचं नातंही नेहमीच चर्चेत होतं. आता जरी अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न झालं असलं तरी एक काळ असा होता जेव्हा अभिषेक हा करिश्मा कपूरवर निस्सीम प्रेम करायचा. दोघांचं ब्रेकअप कधी झालं, काझालं याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत आहे. त्यावेळी बरीच चर्चाही झाली होती. पण मुळात हे दोघे कसे भेटले, त्यांचं नात कसं सुरू झालं हे फार कमी लोकांना माहीत असेल.

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि अनेक व्हायरल व्हिडिओ त्याची साक्ष देतात. पण हे दोघे पहिल्यांदा कसे भेटले आणि त्यांचे प्रेम कसे फुलले हे तुम्हाला माहीत आहे का ? या दोघांची जवळीक बहिणीमुळे वाढली. निखिल नंदा हे अमिताभ बच्चन यांची लाडकी श्वेता नंदा हिचे पती आहेत. ते कपूर कुटुंबातील मुलगी, राज कपूर यांची लेक रितू नंदा यांचा मोठा मुलगा. 1997 साली त्यांचं नात ठरलं. त्यानंतर बच्चन कुटुंब आणि कपूर कुटुंब एकमेकांच्या खूप जवळ आले.त्याचवेळी करिश्मा आणि अभिषेक बच्चन पहिल्यांदा एकमेकांना भेटले.

कशी वाढली जवळीक ?

हे सुद्धा वाचा

श्वेता बच्चन हिच्यामुळे अभिषेक आणि करिश्मा यांची जवळीक वाढली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दोघांची पहिले मैत्री झाली आणि जसजसा वेळ पुढे गेला तसं त्याचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यानंतर बच्चन-कपूर कुटुंबानेही हे नात स्वीकारलं आणि एका सोहळ्यात अमिताभ बच्चन यांनी दोघांच्या साखरपुड्याची घोषणा देखील केली होती. तेव्हा बच्चन कुटुंबाची होणारी सून म्हणून करिश्मा खूपच लाजली होती.

का तुटलं नातं ?

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे कुटुंबीय या नात्यामुळे खूश होते. अमिताभ बच्चन यांनाही करिश्मा कपूर आवडली, त्यांची होणारी सून म्हणून करिश्माची ओळख होती. त्यानंतर अभिषेक -करीश्माचा साखरपुडाही झाला. पण मध्येच माशी शिंकली आणि लग्नाआधीच 2002 मध्ये करिश्मा आणि अभिषेकची एंगेजमेंट तुटली. साखपुडा मोडल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. बबिता यांच्या एका अटीमुळे त्या दोघांचं हे नातं तुटलं असं म्हटलं जातं. त्यामुळेच दोघांचही लग्न होऊ शकलं नाही.

खरंतर त्या दोघांचं नातं ठरलं तेव्हा करिश्मा ही मोठी स्टार होती, तर अभिषेक हा चित्रपटसृष्टीत जम बसवत होता, तो फारसा सेटल झालेला नव्हता. त्यामुळे करिश्माची आई, बबिता यांना तो जावई म्हणून पसंत नव्हता. म्हणूनच अखेर करिश्मा आणि अभिषेकचं नात मोडलं. आणि नंतर अवघ्या काही महिन्यांतच तिने 2003 साली बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर करिश्मा कपूर चित्रपटांपासून दूर राहिली. तर अभिषेकनेही 2007 साली ऐश्वर्या राय हिच्याशी लग्न केले, त्यांना आराध्या नावाची एक गोड मुलगी देखील आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.