Video | भाईजानच्या ‘टायगर 3’साठी कतरिना कैफ गाळतेय जिममध्ये घाम, पाहा व्हिडीओ…

अलीकडेच कतरिना कैफने तिच्या वर्कआऊट सेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये घाम गळतान आणि खूप मेहनत घेताना दिसत आहे.

Video | भाईजानच्या ‘टायगर 3’साठी कतरिना कैफ गाळतेय जिममध्ये घाम, पाहा व्हिडीओ...
कतरिना कैफ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिने आतापर्यंतच्या तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. कतरिना कैफ तिच्या सौंदर्यामुळेही ओळखली जाते. या अभिनेत्रीने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. कतरिनाच्या डान्सचेही चाहते भरपूर आहेत. आता ‘टायगर 3’ या चित्रपटामध्ये कतरिना पुन्हा एकदा सलमान खानसोबत (Salman Khan) दिसणार आहे (Katrina Kaif hardcore workout video gets viral on social media).

यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या ‘टायगर 3’चे (Tiger 3) चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा पुन्हा पुढे ढकलण्यात येत आहे. या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण इस्तंबूलमध्ये होणार आहे. आता कतरिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे की, ती या चित्रपटासाठी सध्या विशेष मेहनत घेत आहे.

कतरिनाचा वर्कआऊट व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट्स नेहमी शेअर करत असते. अलीकडेच कतरिना कैफने तिच्या वर्कआऊट सेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये घाम गळतान आणि खूप मेहनत घेताना दिसत आहे.

पाहा कतरिनाचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनाला घाम गाळताना पाहून चाहत्यांनाही घाम फुटला आहे. कतरिना तिच्या आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिले आहे की, ‘नवीन गोष्टी शिकणे, स्वतःचा प्रवाह शोधणे, काहीही लादून न घेता, जे होते ते होऊ देणे..’.

कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अतिशय चर्चेत आहे. कतरिनाच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ खूप आवडतो आहे आणि त्यावर ते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. यापूर्वी कतरिना कैफने अनेकवेळा आपल्या वर्क आऊट झलक चाहत्यांना दाखवली आहे (Katrina Kaif hardcore workout video gets viral on social media).

या महिन्यात होणार चित्रीकरणाला सुरुवात

बातमीनुसार कोरोनामुळे मुंबईतच ‘टायगर 3’साठीचा तुर्कीश सेट तयार करण्यात आला आहे. या सेटवर तोफखाना टाकी आणि ग्रेनेड इत्यादींचा उपयोग केला जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्यातच निर्मात्यांनी जूनमध्ये इस्तंबूल आणि दुबईला शुटींग करण्याचा विचार केला असून, सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना खूप आवडणार आहे. ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र पडद्यावर येते, तेव्हा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळते. दोघांनी ‘टायगर जिंदा है’, ‘एक था टायगर’, ‘मैने प्यार क्यू किया’, आणि ‘पार्टनर’सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘टायगर 3’ चित्रपटात सलमान खान रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.

(Katrina Kaif hardcore workout video gets viral on social media)

हेही वाचा :

RRR | प्रदर्शनाआधीच रेकॉर्ड ब्रेक कमाई, ‘इतक्या’ कोटींमध्ये विकले गेले ‘RRR’चे हक्क!

आनंद शिंदेंचं ‘नवं नवं लुगडं…’ हे गाणं लंडनच्या हॉलमध्येही गाजलं; या गाण्याचे गीतकार कोण?; हा किस्सा वाचाच!

Published On - 8:00 am, Sat, 3 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI