AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना गाजावाजा, ना मोठा स्टार, तरी ‘हा’ चित्रपट जिंकतोय प्रेक्षकांची मनं; एका राज्यात थेट टॅक्स फ्री

कोणताही गाजावाजा न करता, प्रमोशन न करता हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे यात कोणताही मोठा स्टार नाही, तरीही सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा होत आहे. एका राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्रीसुद्धा करण्यात आला आहे.

ना गाजावाजा, ना मोठा स्टार, तरी 'हा' चित्रपट जिंकतोय प्रेक्षकांची मनं; एका राज्यात थेट टॅक्स फ्री
एका राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला हा चित्रपटImage Credit source: Youtube
| Updated on: May 12, 2026 | 1:25 PM
Share

एखादा चित्रपट जर खरंच चांगला असेल तर कोणत्याही प्रमोशनशिवाय तो प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणू शकतो, हे ‘कृष्णावतारम : पार्ट 1 हृदयम’ने सिद्ध केलं आहे. कोणत्याही मोठ्या स्टारशिवाय, प्रमोशनशिवाय प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट थिएटरमध्ये दमदार कामगिरी करतोय. सुरुवातीला गुरुवारी फक्त 500 शोजसह हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रचारामुळे त्याला चांगला फायदा मिळू लागला आहे. पहिल्या दिवसापासून ‘कृष्णावतारम’ला चांगले रिव्ह्यू मिळाले आणि शुक्रवारपासून त्याच्या शोजमध्ये वाढ करण्यात आली. शुक्रवारच्या तुलनेत या चित्रपटाची कमाई शनिवारी दुप्पट झाली. हार्दिक गज्जर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 40 लाख रुपये कमावले होते.

प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून थिएटर मालकांनी या चित्रपटाचे शोज वाढवले. शुक्रवारी ‘कृष्णावतारम’चे 1500 शोज चालले आणि त्यादिवशी कमाईसुद्धा 1.15 कोटी रुपये झाली. शनिवारी ही कमाई दुपटीने वाढून 2.25 कोटी रुपये इतकी झाली. कलेक्शनचा हा आकडा जरी लहान दिसत असला तरी शोजच्या तुलनेत ही कामगिरी चांगली आहे. शनिवारी या चित्रपटाचे शोज 1700 च्या जवळपास होते. म्हणजेच प्रत्येक दिवशी या चित्रपटाचे शोज, शोजमधील गर्दी आणि कमाई या तिन्ही गोष्टी वाढत आहेत.

पहा ट्रेलर-

‘कृष्णावतारम’मध्ये भगवान श्रीकृष्ण यांची कथा दाखवण्यात आली असून यामध्ये सिद्धार्थ गुप्ता, सुष्मिता भट, संस्कृती जायना आणि निवाशियनी कृष्णन यांच्या मुख्य भूमिका आहेत. मर्यादित बजेट असूनही या चित्रपटातील व्हिज्युअल्स, व्हीएफएक्स, संगीत दमदार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखनौ इथल्या लोकभवन सभागृहात या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला उपस्थित राहिल्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आल्याची घोषणा केली.

“हा चित्रपट भगवान श्रीकृष्ण यांचं जीवन मानवी दृष्टीकोनातून सादर करतो. द्वापार काळ, सनातन संस्कृती आणि भारतीय परंपरा यांचं चित्रण अत्यंत भव्यतेनं करण्यात आलं आहे. या चित्रपटात राधा, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या कथा दाखवण्यात आल्या आहेत”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात या चित्रपटाचं विशेष प्रदर्शन आयोजित कण्याचे निर्देश माहिती व प्रसारण विभागाला दिले आहेत. ‘कृष्णावतारम पार्ट 1: हृदयम’ हा चित्रपट 7 मे रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

Follow Us
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!