शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन

भारतीय शास्त्रीय गायक, संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं आज वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. (musician Ustad Ghulam Mustafa Khan passes away)

शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 6:39 PM

मुंबई: भारतीय शास्त्रीय गायक, संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं आज वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. खान यांची सून नम्रता गुप्ता-खान यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि एआर रहमान यांनी शोक व्यक्त केला आहे. (musician Ustad Ghulam Mustafa Khan passes away)

संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. खान यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. माझ्या सासऱ्याचं काही मिनिटांपूर्वीच निधन झालं. आमच्या कुटुंबाचा आधार आणि देशातील लिजंड, पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आज जगाचा निरोप घेतला, असं ट्विट नम्रता यांनी केलं आहे.

लता मंगेशकर यांनी खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी कळली. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून दु:ख झालं. ते महान गायक होतेच, पण माणूस म्हणूनही ते खूप चांगले होते, अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या भाचीनेही खान साहेबांकडून संगीताचे धडे गिरवले आहेत. मीही त्यांच्याकडून संगीताचे थोडेबहूत धडे गिरवले आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करते, असं त्यांनी म्हटलं आहे.

प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांनीही खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सर्वात प्रिय शिक्षक…. गफूर उर रहीम तुम्हाला दुसऱ्या दुनियेत विशेष स्थान देवो, अशा शब्दांत रहमानने शोक व्यक्त केला आहे. (musician Ustad Ghulam Mustafa Khan passes away)

संबंधित बातम्या:

Tandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात ‘तांडव’; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार

Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

RIP Pista : ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

(musician Ustad Ghulam Mustafa Khan passes away)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.