AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahavatar Narsimha : काय? थिएटरमध्ये सुरू असतानाच ‘महावतार नरसिम्हा’ ओटीटीवरही आला? निर्माते म्हणाले..

'महावतार नरसिम्हा' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर आहेत. याविषयी आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयी महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी दिली आहे.

Mahavatar Narsimha : काय? थिएटरमध्ये सुरू असतानाच 'महावतार नरसिम्हा' ओटीटीवरही आला? निर्माते म्हणाले..
महावतार नरसिम्हाImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 07, 2025 | 9:02 AM
Share

अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घालतोय. भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत असताना आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची ही चर्चा आहे. याबद्दल आता निर्मात्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

काय म्हणाले निर्माते?

‘महावतार नरसिम्हा’च्या निर्मात्यांनी त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टद्वार केला जात आहे. परंतु सध्या हा चित्रपट फक्त थिएटरमध्ये सुरू असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलंय.

क्लीम प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर याविषयीची पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘महावतार नरसिम्हा आणि त्याच्या ओटीटी रिलीजविषयी जी चर्चा सध्या सुरू आहे, त्याचे आम्ही आभारी आहोत. परंतु सध्या हा चित्रपट जगभरात केवळ थिएटरमध्येच सुरू आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयी कोणताच करार निश्चित झालेला नाही, कोणतीच डील झालेली नाही. तुम्ही फक्त आमच्या अधिकृत हँडलवर शेअर केलेल्या अपडेटवरच विश्वास ठेवा.’

निर्मात्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘महावतार नरसिम्हाशी संबंधित अफवांवर विश्वास ठेवू नका. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीच्या बऱ्याच अफवा आमच्यापर्यंतही पोहोचल्या आहेत. परंतु आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, सध्या हा चित्रपट फक्त थिएटरमध्येच दाखवला जात आहे. आम्ही कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मशी त्यासंदर्भात डील केलेली नाही.’

‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट 25 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा एक अॅनिमेटेड चित्रपट आहे. या फ्रँचाइजीमध्ये इतरही चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी ‘महावतार परशुराम’ हा चित्रपट 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अपेक्षेपेक्षाही खूप चांगली कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाने भारतात अवघ्या 10 दिवसांत 91.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रल्हादाची भक्ती आणि आपल्या भक्तासाठी नरसिंहाच्या अवतारात धावून येणारे भगवान विष्णू यांची ही पौराणिक कथा प्रेक्षकांच्या मनाला खूप भावली. म्हणूनच सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावरही या एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.