AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरबाज खानला घटस्फोट देण्यापूर्वीच्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने स्वतः सांगितली संपूर्ण कहाणी

मलायका अरोराने 2017मध्ये पती अरबाज खानला 19 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट दिला. घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं? ते जाणून घ्या...

अरबाज खानला घटस्फोट देण्यापूर्वीच्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने स्वतः सांगितली संपूर्ण कहाणी
Malaika and arbazImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 29, 2025 | 7:28 PM
Share

अरबाज खान आणि मलायका अरोरा एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक होते. मात्र, सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांनी आपलं नातं संपवून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. 2017 मध्ये त्यांनी त्यांचं 19 वर्षांचं वैवाहिक जीवन घटस्फोटाने संपवले. यावर मलायका आणि अरबाज दोघांनीही अनेकदा उघडपणे बोलले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की घटस्फोटापूर्वीच्या रात्री नेमकं काय घडलं होतं? चला, याबाबत मलायकाने स्वतः काय सांगितलं ते पाहूया…

घटस्फोटापूर्वी मलायकाला कोणता सल्ला मिळाला?

मलायकाने घटस्फोटानंतर करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये मलायकाने मनातील अनेक गोष्टींवर भाष्य केले. करीनाने मलायकाला विचारलं होतं की, घटस्फोटादरम्यान तिला कुटुंबीय आणि मित्रांकडून कोणता सल्ला मिळाला? यावर मलायकाने उत्तर दिलं की, “मला वाटतं की प्रत्येकाची पहिली प्रतिक्रिया हीच होती की घटस्फोट घेऊ नको, कोणीही असं म्हणणार नाही की जा आणि घटस्फोट घे. त्यामुळे पहिली गोष्ट होती की घटस्फोट घेऊ नको, विचारपूर्वक निर्णय घे.”

वाचा: मृत्यूनंतर श्रीदेवीच्या तोंडात ठेवण्यात आला सोन्याचा तुकडा, काय होते कारण?

घटस्फोटापूर्वीच्या रात्री काय घडलं?

करीना कपूरसमोर मलायकाने हे देखील सांगितलं की, ज्या दिवशी घटस्फोटाच्या अर्जावर कोर्टात सुनावणी होणार होती, त्याच्या आधीच्या रात्री काय घडलं. ती म्हणाली, “घटस्फोटाच्या अगदी आधीच्या रात्री संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत बसलं आणि पुन्हा एकदा विचारलं, ‘तू खरंच याबाबत ठाम आहेस का? तुझ्या निर्णयावर तू 100 टक्के निश्चित आहेस का?’ मी हे बराच काळ ऐकत होते आणि मला वाटत होतं की हे ते लोक आहेत ज्यांना माझी काळजी आहे आणि माझी चिंता आहे. त्यामुळे ते नक्कीच असं बोलतील.”

1998 मध्ये झालं होतं लग्न

मलायका आणि अरबाज यांची पहिली भेट 1993 मध्ये एका शूटदरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. सुमारे पाच वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी 1998 मध्ये लग्न केलं. 2002 मध्ये त्यांना मुलगा अरहान खान झाला. पण 2017 मध्ये घटस्फोट घेऊन त्यांनी आपले मार्ग वेगळे केले. अरबाजने 2023 मध्ये शूरा खानसोबत दुसरं लग्न केलं, तर मलायकाने दुसऱ्यांदा संसार थाटलेला नाही.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......