Video: वारकऱ्यांच्या सेवेत अभिनेत्री दंग; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांच्या मनाला या पंढरीच्या वारीची ओढ लागते. असंख्य वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतात. वारकऱ्यांचा हा अनुपम सोहळा संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.

Video: वारकऱ्यांच्या सेवेत अभिनेत्री दंग; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Kashmira Kulkarni
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 27, 2022 | 2:17 PM

पंढरीची वारी (Pandharichi Wari) म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा मोठा उत्सवच. हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती या वारीत (Wari) पहायला मिळते. आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांच्या मनाला या पंढरीच्या वारीची ओढ लागते. असंख्य वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतात. वारकऱ्यांचा हा अनुपम सोहळा संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. यंदाची वारी वारकऱ्यांसाठी खूपच खास आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे वारी होऊ शकली नव्हती. अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीसुद्धा (Kashmira Kulkarni) यंदा वारीत सहभागी असून तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये कश्मिरा वारकऱ्यांची सेवा करताना पहायला मिळत आहे.

कश्मिराची पोस्ट-

‘पंढरीची वारी.. वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय. इथे माणसांमधला देव पाहता येतो. माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो. अशाच एका वारीचा अनुभव,’ असं कॅप्शन देत कश्मिराने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmira Kulkarni (@actresskashmira)

शुचिकृत्य फाऊंडेशनच्या माध्यमातून कश्मिरा वारकऱ्यांची सेवा करतेय. या व्हिडीओत तिने फाऊंडेशनबद्दलही माहिती दिली आहे. वारकऱ्यांचं प्रथमोपचार, त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प, चहा आणि जेवणाची सोय अशा विविध प्रकारची मदत कश्मिरा करताना दिसतेय. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो’, असं एका युजरने म्हटलंय. तर ‘सगळया वारकरी आणि विठु माऊलीचे आशिर्वाद तुम्हाला मिळो,’ असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘तू खूप छान काम करतेय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कश्मिराच्या कामाचं कौतुक केलं. कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी तिला आशीर्वाद दिला.

कश्मिराने ‘कॅरी ऑन मराठा’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. यामध्ये तिने गश्मीर महाजनीसोबत काम केलं होतं. कश्मिराने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें