AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री पर्ण पेठे ‘या’ माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; कधी? कुठे? वाचा सविस्तर…

Actress Parn Pethe New Movie Vishay Hard Release : अभिनेत्री पर्ण पेठे हिचं नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एक नवा सिनेमा घेऊन पर्ण पेठे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमातील नवं गाणं आता रिलीज झालं आहे. पर्णचं हे नवं गाणं तुम्ही पाहिलंत का? माहिती वाचा सविस्तर...

अभिनेत्री पर्ण पेठे 'या' माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; कधी? कुठे? वाचा सविस्तर...
पर्ण पेठेImage Credit source: TV9
| Updated on: May 30, 2024 | 8:13 PM
Share

वेगळ्या धाटणीचे सिनेमे घेऊन अभिनेत्री पर्ण पेठे प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिच्या अभिनयाचे अनेकजण फॅन आहेत. आता पर्ण पेठे एका नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘विषय हार्ड’ हा पर्ण पेठेचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीतील रांगड्या भाषेचा साज लेवून सजलेल्या ‘विषय हार्ड’ या चित्रपटातील ‘येडं हे मन माझं…’ हे प्रेमगीत नुकतंच सिनेरसिकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याची सध्या चर्चा होतेय. प्रेमाची अनोखी कथा सांगणारा ‘विषय हार्ड’ हा मराठी चित्रपट येत्या 5 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोणता सिनेमा?

‘विषय हार्ड’ सिनेमाच्या निमित्ताने एकीकडे पर्णचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज या गाण्यात पाहायला मिळतो आहे. तर सुमित पाटीलच्या अभिनयानेही लक्ष वेधून घेते. हे गाणं म्हणजे या चित्रपटातील नायक-नायिकेच्या बालपणापासून तरुणपणापर्यंतच्या आठवणींचा जणू एक अल्बमच आहे. ‘येडं हे मन माझं, न्हालं प्रेमामध्ये, बावरलं, सावरलं गं रंगलंय…’ हे शब्द प्रेमाचा खराखुरा अर्थ सांगून जातात. या गाण्याचे छायाचित्रण अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी केलं आहे.

बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज या बॅनरखाली ‘विषय हार्ड’ची निर्मिती गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील यांनी केली आहे. सुमित यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनीच कथालेखनाची जबाबदारीही सांभाळली आहे. सोशल मीडियावर या प्रेमगीताला अफलातून पसंती मिळत असून या गाण्यानं संगीतप्रेमींना ‘येड’ लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कोण-कोण कलाकार सिनेमात असणार?

पर्ण आणि सुमित पाटील ‘विषय हार्ड’ सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकार आहेत.या चित्रपटातील गीतांचे लेखन नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी केले आहे. साहिल कुलकर्णी यांनी या गीतांना संगीत दिलं आहे.

अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार शेटे यांनी सांभाळली असून, सायली घोरपडे यांनी वेशभूषा केली आहे. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन केलं असून, संदीप गावडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.