‘अजिंक्य आला रे!!’, प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधानच्या ‘अजिंक्य’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे चित्रित नव्या धाटणीचा चित्रपट ‘अजिंक्य’चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘अजिंक्य’ सिनेमा येत्या 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, हा संपुर्ण चित्रपट ग्रामीण आणि नगरी भागांत सातत्याने दिसत असलेल्या आर्थिक परिस्थिती वर भाष्य करणारा चित्रपट आहे.

‘अजिंक्य आला रे!!’, प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधानच्या ‘अजिंक्य’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Bhushan-Prarthana

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे चित्रित नव्या धाटणीचा चित्रपट ‘अजिंक्य’चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ल्युमिनरी सिने वर्ल्ड आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. यांचा ‘अजिंक्य’ सिनेमा येत्या 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, हा संपुर्ण चित्रपट ग्रामीण आणि नगरी भागांत सातत्याने दिसत असलेल्या आर्थिक परिस्थिती वर भाष्य करणारा चित्रपट आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या चित्रित झालेला ‘अजिंक्य’ गतवर्षी प्रदर्शनाच्या मार्गावर असताना कोरोनाने संपूर्ण जगावर संकट उभे केले. परंतु आता परिस्थिती पूर्ववत होत असल्या कारणाने महाराष्ट्र सरकारने चित्रपट प्रदर्शनाला परवानगी दिली आहे.

आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक ”अजिंक्य”च्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अजिंक्य च्या भूमिकेत असलेल्या भूषण प्रधानचा “कॉर्पोरेट लूक” सर्वांचे लक्ष वेधून घेतो, त्यासोबत असलेली प्रार्थना तितकीच सुंदर आणि सोज्वळ दिसते. या सिनेमात जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कोरोनामुळे लागला होता ब्रेक

गेल्या वर्षी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोरोनामुळे जरी स्थगिती मिळाली असली तरी आता सगळं काही पूर्ववत आल्यानंतर चित्रपटाचे निर्माते तसेच दिग्दर्शक प्रदर्शनासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. ‘शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या जाणवणारी तफावत प्रखरतेने मांडणारा चित्रपट म्हणजे अजिंक्य हा होय. चित्रपट दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला यातून खूप अपेक्षा आहेत, असे चित्रपटाचे दिग्दर्शक अ. कदिर या निमित्ताने सांगतात. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जितकी आव्हाने आली त्याच्या दुप्पट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी आली, एक निर्माता म्हणून आम्हाला सर्व बाबींचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा आदर करतो, असे चित्रपटाचे निर्माते नीरज आनंद म्हणतात.

गाण्यांनाही उत्तम प्रतिसाद

ल्युमिनरी सिने वर्ल्ड निर्मित आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. प्रस्तुत ”अजिंक्य” चे निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा हे असून उमेश नार्वेकर सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं आहे तसेच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाददेखील अ. कदिर यांचे असून अ. कदिर यांचा हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. रोहन- रोहन यांनी दिलेल्या संगीताने या चित्रपटाची शोभा वाढली आहे. “अलगद अलगद”, “स्वप्नांना”, “आता तरी बोल ना” आणि “फेव्हरेट राव” या गाण्यांना चाहतेवर्गाकडून पसंती मिळत आहे.

भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे या दोघांनाही चित्रपटगृहात पाहणे हे प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बाब असणार आहे. येत्या 19 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात चित्रपट प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

Urfi Javed | ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर उर्फी जावेदने दाखवला हॉटनेस, पाहा अभिनेत्रीचा बोल्ड लूक

Nora Fatehi | मोत्यांच्या माळा, चांदीची चमचम अन् नोरा फतेहीचा दिलखेचक अंदाज, अभिनेत्रीचे नवे फोटो पाहिलेत का?


Published On - 11:54 am, Sat, 13 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI