Takatak 2: बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा डंका; ‘टकाटक 2’ने पहिल्या वीकेंडला जमवला कोटींचा गल्ला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 23, 2022 | 9:32 AM

पहिल्या शोपासूनच या चित्रपटानं नेत्रदीपक यश मिळवण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा उत्सव असतानाही प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्याला प्राधान्य दिला.

Takatak 2: बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा डंका; 'टकाटक 2'ने पहिल्या वीकेंडला जमवला कोटींचा गल्ला
'टकाटक 2'ने पहिल्या वीकेंडला जमवला कोटींचा गल्ला
Image Credit source: Tv9

मराठी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा ‘टकाटक’ मनोरंजनाचा खजिना खुला झाला आहे. मराठी तिकिटबारीवर प्रेक्षक ‘टकाटक’ मनोरंजनाची जादू अनुभवत आहेत. ‘टकाटक 2’ (Takatak 2) या मराठी चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळवलं आहे. याच बळावर ‘टकाटक 2’च्या खात्यावर पहिल्या वीकेंडला तब्बल 2.11 कोटी रुपयांचा गल्ला (Box Office Collection) जमा झाला आहे. जन्माष्टमीच्या (Janmashtami) मुहुर्तावर 18 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षक गर्दी करत आहेत. पहिल्या भागाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर ‘टकाटक 2’च्या रूपात पुढील भाग प्रदर्शित झाला आहे. सुरेख संकल्पना, आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, लक्षवेधी अभिनय, विनोदामागे दडलेला संदेश, सुमधूर गीत-संगीत रचना, कलात्मक दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या बळावर या चित्रपटानं रसिकांची मनं जिंकली आहेत.

महाराष्ट्रातील बर्‍याच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट गर्दी खेचत आहे. याच बळावर ‘टकाटक 2’नं 2.11 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पहिल्या शोपासूनच या चित्रपटानं नेत्रदीपक यश मिळवण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा उत्सव असतानाही प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्याला प्राधान्य दिला. शनिवार आणि रविवारी या चित्रपटानं सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. आज जिथे हिंदी चित्रपट पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत नसताना ‘टकाटक 2’नं पुन्हा एकदा रसिकांना सिनेमागृहांपर्यंत आणण्याची किमया केली आहे. यातील मैत्रीच्या मुद्द्यासोबतच चित्रपटात देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण संदेशाचे प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत.

 

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

‘टकाटक 2’चं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं असून, संकल्पना-कथा-पटकथा लेखनही त्यांनीच केलं आहे. प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे या कलाकारांनी चित्रपटात केलेली धमाल प्रेक्षक एन्जॅाय करत आहेत. संवादलेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केलं आहे. हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘टकाटक 2’ची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी, नरेश चौधरी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI