AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… अन सेटवर रंगला मास्क-सॅनिटायझरचा खेळ

मराठी सिनेसृष्टी हळूहळू अनलॉक होत असून महाराष्ट्रातील अनेक शूटिंग लोकेशनवर मराठी चित्रपटांचे तसेच मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे.

... अन सेटवर रंगला मास्क-सॅनिटायझरचा खेळ
| Updated on: Jan 20, 2021 | 4:42 PM
Share

मुंबई : मराठी सिनेसृष्टी हळूहळू अनलॉक होत असून महाराष्ट्रातील अनेक शूटिंग लोकेशनवर मराठी चित्रपटांचे तसेच मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे. मराठी कलाकारांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कामाला सुरुवात केली. आगामी मराठी चित्रपट “मराठी पाऊल पडते पुढे” याचे शूटिंग सुरू झाले होते. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी निर्माते आणि कलाकार यांनी सर्वानी एक अनोखा खेळ खेळत या शूटिंगची सांगता केली. खेळात चित्रपटाचे निर्माते प्रकाश बाविस्कर हे सर्व कलाकारांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचा अभिनय करायला सांगतात. (The shooting of the movie Marathi Paul Padte Pudhe is over)

मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरत आपली नवी ओळख बनवावी ही या चित्रपटाची कहाणी आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे स्वतः यशस्वी मराठी उद्योजक असून चित्रपट निर्माते म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे तसेच अकात डिस्ट्रिब्युशनचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्नील मयेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव अभिनेता “चिराग पाटील” जे बहुचर्चित बॉलिवूड सिनेमा ८३ या मध्ये खुद्द क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका बजावणार असून “मराठी पाऊल पडते पुढे” या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी पाटणे आपल्याला चिरागसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे या चित्रपटात खलभूमिका निभावत आहेत, अभिनेता संजय कुलकर्णी आणि अभिनेता सतीश सलागरे यांचीदेखील उल्लेखनीय भूमिका आहे. याचे चित्रीकरण सध्या संपले असून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार ही माहिती अजून तरी गुलदस्त्यात आहे.

संबंधित बातम्या : 

‘मानाचा मुजरा’चे 10 लाख भरा, अलका कुबल, विजय पाटकरांसह 11 जणांना दणका

Marathi Serial : ‘शिक्षक ते अभिनेता…’,वाचा रघू म्हणजेच संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

(The shooting of the movie Marathi Paul Padte Pudhe is over)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.