AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वेळा वाईट स्पर्श आणि…, दिग्दर्शकाचा ‘डर्टी पिक्चर’ अखेर समोर, मोनालिसाकडून सत्य अखेर समोर

व्हायरल गर्ल मोनालिसासाठी 'द डायरी ऑफ मणिपूर' सिनेमा ठरला घातक, दिग्दर्शकाचा 'डर्ची पिक्चर' अखेर समोर... मोनालिसा हिने अखेर सत्य सांगितलंच... कुटुंबियांनी देखील नाही दिला पाठिंबा...

10 वेळा वाईट स्पर्श आणि..., दिग्दर्शकाचा 'डर्टी पिक्चर' अखेर समोर, मोनालिसाकडून सत्य अखेर समोर
व्हायरल गर्ल मोनालिसा
| Updated on: May 02, 2026 | 10:41 AM
Share

कुंभमेळ्यातून व्हायलर झालेल्या मोनालिसा हिला जेव्हा सिनेमात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा गरीब मुलीचं नशीब उजळलं असं सर्वांना वाटलं. पण तिला या प्रसिद्धीचे वाईच परिणाम भोगावे लागले. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, वाईट घटना घडल्याची कबुली मोनालिसा हिने दिली आहे. नुकताच, एर्नाकुलम सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्या अंतर्गत गंभीर कलमांखाली चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत तिने चित्रपटसृष्टी आणि इतर क्षेत्रांतील लोकांवर आरोप केले आहेत.

मोनालिसाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि वकील अनिल विलायिल यांचं देखील नाव आहे. तिने सिनेमा दिग्दर्शक सनोज मिश्रा याच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, संबंधित एफआयआर बुधवार, 29 एप्रिल 2026 रोजी दाखल करण्यात आला.

तक्रारीत मोनालिसानं म्हटलं आहे की, ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तिला अयोग्य वागणुकीला सामोरं जावं लागलं. कोची येथे एका पत्रकार परिषदेत तिने दावा केला की, दिग्दर्शक सानोज मिश्रा याने तिला अनेक वेळा वाईटरित्या स्पर्श केला. शुटिंग सुरु असताना असुरक्षित वाटत असल्याचं देखील मोनालिसा हिने सांगितले. मोनालिसा म्हणाली, “दिग्दर्शकाने मला 10 वेळा वाईटरित्या स्पर्श केला. माझ्या कुटुंबीयांनीही मला पाठिंबा दिला नाही.”

मोनालिसा पुढे म्हणाली, जेव्हा कुटुंबियांना याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी देखील लक्ष दिलं नाही. एवढंच नाही तर, कुटुंबाने तिला पाठिंबा देण्यासही नकार दिला. अखेर मोनालिसा हिने कायदेशीर मदत घेण्याचा निर्णय घेतला. वकील अनिल विलायिल यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोनालिसाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसा 30 एप्रिल, गुरुवारी न्यायालयात हजर झाली, जिथे तिने अधिकृत जबाब नोंदवला. या घटना मध्य प्रदेशात घडल्या असल्याने, हे प्रकरण मध्य प्रदेश पोलिसांकडे वर्ग केलं जाऊ शकतं, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

मोनालिसा आणि फरमान यांचं लग्न

मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नाला विरोध करत कुटुंबियांनी ‘लव्ह जिहाद’चे आरोप केले आहे. त्याने असा आरोप केला की मोनालिसाला लग्नासाठी फूस लावली गेली. मात्र, मोनालिसा सुरुवातीपासूनच आपल्या निर्णयांचं समर्थन करत आहे. एवढंच नाही तर, आपण सज्ञान असल्याचा दावा करत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....