Sanjay Raut : मोदी म्हणतात, सबकुछ ठीक है, पण… दरवाढीवरून राऊतांचे टीकास्त्र
देशभरात महागाई वाढत असून गॅस आणि इंधनाच्या दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. व्यावसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून, घरगुती गॅस व पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत, 'सबकुछ ठीक' नसल्याचे म्हटले आहे. राऊतांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या विजयाचे भाकीतही केले आहे.

देशभरात महागाई वाढत असल्याचे दिसत आहे. एकीकडे गॅस दरवाढीचे चटके लोकांना सहन करावे लागत आहेत. व्यावसायिक गॅस दरवाढीचा स्फोट झाला आहे. एकाच दमात सरकारने 993 रुपयांनी गॅस दरवाढ केली, तर घरगुती गॅसच्या किंमतीही आता वाढू शकतात. तसेच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरही दरवाढीची कुऱ्हाड पडू शकते आणि त्याचा फटका आता सामान्य लोकांना सहन करावा लागू शकतो. याच मुद्यावरू शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
सबकुछ ठीक नही..
काल गॅसचे भाव वाढले, येणाऱ्या काळातत इंधनाचे भावही वाढू शकता. नक्कीच हे होऊ शकतं. प्रवास महागतोय, हवाई प्रवास महागणार, बोटीचा, रस्त्यावरचा प्रवास महागणार आहे. जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे, ते सर्व महागणार आहे. मोदीजी म्हणतात, सबकुछ ठीक है, पण तसं काहीही नाही. ते सबकुछ ठीक फक्त पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी मतदान होईपर्यंत, सबकुछ ठीक असतं. आता यापुढे नाही, असं म्हणत राऊतांनी दरवाढीवरून सरकारला टोला लगावला.
बंगालमध्ये काय निकाल लागणार ?
पश्चिम बंगालसह 5 राज्यातील निवडणुकांचं मतदान झालं आणि सोमवराी, 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यावरही राऊतांनी भाष्य केलं. ममता बॅनर्जी या 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकून बहुमताने सत्तेत येतील, असं राऊत म्हणाले.
अमित शहांना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काही कुलूप लावलेलं नाही ना. फसफसणारा आत्मविश्वास आहे, माणसांना खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या आत्मविश्वासाला झालं काय. पण ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारणचं काम, कार्य केलं आहे, मल असं वाटतं, जी माहिती मला मिळाली, त्यावरून वाटतं की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही, असंही राऊतांनी नमूद केलं.
