मुनव्वर फारुकीची दुसरी पत्नी आहे मुलीची आई, मेहजबीनपेक्षा सुंदर दिसते चिमुकली
Munawar Faruqui Second Wife | मुनव्वर फारुकीची दुसरी पत्नी आहे घटस्फोटीत आणि एका मुलीची आई, मेहजबीनचं अनेक सेलिब्रिटींसोबत खास कनेक्शन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याच्या खासगी आयुष्याची चर्चा... जाणून घ्या त्याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल

स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील मुनव्वर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मुनव्वर याने 26 मे रोजी गुपचूप दुसरं लग्न केलं आहे. मुनव्वर याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मेहजबीन कोटवाला असून ती एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. मेहजबीन कोटवाला आणि मुनव्वर फारुकी यांच्या लग्नात फक्त खास व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आले नाहीत, पण मुनव्वर याने 29 मे रोजी मेहजबीन कोटवाला हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र दोघांचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
तुम्हाला मेहजबीन कोटवाला कोण आहे आणि ती काय करते? याबद्दल तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल. मेहजबीन हिने ‘झलक दिखला जा’ डान्स रिॲलिटी शोमध्ये काम केल्याचे फार कमी लोकांना माहीत आहे. धनश्री वर्मा हिच्यासोबत मोहजबीन हिचे अनेक फोटो आहेत.
View this post on Instagram
मेहजबीन प्रसिद्ध आणि लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील सेलिब्रिटींचं मेकअप केलं आहे. अभिनेता वरुण धवन, आर माधवन, एवढंच नाहीतर, अभिनेत्री करिना कपूर हिचा देखील मेहजबीन हिने मेकअप केला आहे. मेहजबीन हिने मुनव्वर याचा देखील मेकअप केला आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेत्री हिना खान हिने मुनव्वर याला मेहजबीन हिच्याकडे मेकअपसाठी पाठवलं होतं. तेव्हा मेहजबीन आणि मुनव्वर यांच्यामध्ये मैत्री झाली. अखेर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एका म्यूझीक व्हिडीओमध्ये एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, मेहजबीन कोटवाला हिचा देखील घटस्फोट झाला आहे. मेहजबीन हिला 10 वर्षांची मुलगी आहे. सांगायचं झालं तर, मुनव्वर यांचा देखील घटस्फोट झाला आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव जास्मिन असं आहे. 2022 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
मेहजबीन कोटवाला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मेहजबीन कोटवाला लेकीसोबत देखील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 31.5K फॉलोअर्स आहे.
