Hardik Pandya: ‘सर्वात कठीण परिस्थितीतच देव…’, घटस्फोटानंतर देवाला असं काय म्हणाली नताशा?
Hardik Pandya - Natasa Stankovic: 'सर्वात कठीण परिस्थितीतच देव...', हार्दिक पांड्या सोबत घटस्फोटाने नताशाने पुन्हा शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, देवाला काय म्हणाली नताशा?, नताशा हिची सोशल मीडिया पोस्ट सध्या होत आहे व्हायरल...

भारतीय क्रिकेट संघाचा दमदार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जेव्हा नताशा हिने मुलासोबत देश सोडला त्यानंतर हार्दिक याने सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली. दोघांनी देखील सोशल मीडियावर घटस्फोट झाल्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला. घटस्फोटानंतर नताशा मुलासोबत तिच्या मायदेशी गेली आहे. नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मुलासोबत खास क्षण व्यतीत करताना अभिनेत्री दिसते. आता देखील नताशा हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नताशा हिने देवाचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे… हे सांगितलं आहे. नताशा म्हणाली, ‘कधी कधी काही गोष्टी जाऊ द्याव्या लागतात… कारण देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. तुम्हाला जर वाटत असेल की देव ऐकतो का? तर तुम्हाला देखील देवाप्रती समर्पित व्हावं लागेल…’
‘त्याची इच्छा… योग्य वेळ… त्याच्या योग्य योजना… त्याच्या मनापर्यंत मार्ग… आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातच देव त्याचा उत्तम चमत्कार दाखवत असतो…’ असं नताशा हिने म्हटलं आहे. घटस्फोटानंतर नताशा हिने पोस्ट शेअर केली आहे, त्यामुळे हार्दिक आयुष्यातून गेल्यामुळे नताशाने पोस्ट शेअर केली… अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
नताशाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री?
सांगायचं झालं तर, नताशा हिने काही दिवसांपूर्वी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये नताशा कारमध्ये बसली होती. फोटो पोस्ट करत नताशा म्हणाली, ‘देवांद्वारे दिग्दर्शित… सर्वत्र प्रेम.., कृतज्ञतामध्ये स्वतःला वाहून घेत आहे… उत्तम अनुभव…’ नताशाची पोस्ट तुफान चर्चेत राहिली. सांगायचं झालं तर, हार्दिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नताशा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय मुलाचा वाढदिवस देखील नताशाने एकटीने साजरा केला.
हार्दिक पांड्या – नताशा यांचा घटस्फोट
गेल्या अनेक दिवसांपासून नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर यंदाच्या वर्षी दोघांनी देखील घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर नताशा तिच्या आईकडे आहे. सर्बियाची नताशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत अपडेट्स देत असते. नताशा – हार्दिक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
