AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलिकडच्या काळात फुटतायत आमदार, खासदार..; मराठी अभिनेत्याचा पत्नीसाठी भन्नाट उखाणा

'कारभारी लयभारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटेची जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली. तर संगीत समारंभात निखिलने अनुष्कासाठी भन्नाट उखाणा घेतला आहे.

अलिकडच्या काळात फुटतायत आमदार, खासदार..; मराठी अभिनेत्याचा पत्नीसाठी भन्नाट उखाणा
Anushka Sarkate and Nikhil ChavanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2026 | 1:03 PM
Share

जवळपास पाच वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘कारभारी लयभारी’ ही मालिका सुरू झाली होती. यामध्ये अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. निखिल आणि अनुष्काने लग्नगाठ बांधत आता आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. नुकताच या दोघांचा अत्यंत थाटामाटाच लग्नसोहळा पार पडला. त्यापूर्वी हळद आणि संगीताच्या कार्यक्रमाचेही विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत. असाच एक निखिलच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. संगीत समारंभात निखिलने अनुष्कासाठी भन्नाट उखाणा घेतला आहे. या उखाण्यात सध्या राज्यातील राजकारणात जे सुरू आहे, त्या मोठ्या घडामोडींचा उल्लेख आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाचे नऊपैकी तब्बल सहा खासदार फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत. याचाच उल्लेख करत निखिलने अनुष्कासाठी उखाणा घेतला. “अलिकडच्या काळात फुटतायत आमदार, खासदार.. मी जरी असलो जबाबदार, तरी माझ्या आनंदासाठी अनुष्काच जबाबदार,” असा भन्नाट उखाणा निखिलने घेतला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि हसत निखिलला दाद दिली.

लग्नाआधी निखिल आणि अनुष्कासाठी अभिनेते भरत जाधव आणि सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. या केळवणाला कमलाकर सातपुते, शर्मिला शिंदेही उपस्थित होते. केळवणाच्या कार्यक्रमातही निखिल आणि अनुष्का यांनी एकमेकांसाठी उखाणे घेतले. ‘लग्नसराई सुरू झाली लवकरच दारी येणार निखिलची वरात.. तू तू मी मी चे पुढील प्रयोग आता होणार आमच्याच घरात’, असा भन्नाट उखाणा अनुष्काने निखिलसाठी घेतला होता. त्यानंतर निखिलनेही अनुष्कासाठी खास उखाणा घेतला. ‘भरत सरांना सांगितलं, मी लग्न करतोय तर सर म्हणाले सही रे सही.. अनुष्का वचन दिले मी तुला कधी होणार नाही तू तू मी मी’, असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या होत्या.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक