AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी

'कारभारी लयभारी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. मात्र या दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यातील एका फोटोवरून नेटकरी टीका करत आहेत.

| Updated on: Jun 25, 2026 | 12:23 PM
Share
'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. नुकताच त्यांचा साखरपुडाही थाटामाटात पार पडला. अनुष्का आणि निखिलने इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र त्यातील एका फोटोवरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

1 / 5
या फोटोमध्ये अनुष्का आणि निखिल हे एका नव्याकोऱ्या आणि अत्यंत महागड्या कारच्या बाजूला उभे असल्याचं दिसतंय. नव्या आयुष्याची सुरवात नव्या गाडीने करतोय, असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये आणखी एक ज्येष्ठ व्यक्ती दिसून येत आहे. त्यामुळे सासऱ्यांनी निखिलला हुंडा म्हणून ही महागडी कार दिली का, असा सवाल नेटकरी करत आहेत.

2 / 5
'हुंडा देणं आणि घेणं दोन्हीही चुकीचं आहे. अशा प्रथांचं तुम्ही समर्थन करून तुम्ही चुकीचा आदर्श ठेवत आहात. तुम्ही म्हणाल की ही गाडी आम्ही स्वतः घेतली. तर मग तोच फोटो पहिला का? अंगठी किंवा तुमचा फोटो अगोदर का टाकला नाही? साखरपुड्याचा त्याचाशी काय संबंध,' असे सवाल एका युजरने केले आहेत.

3 / 5
दुसऱ्या युजरनेही टीका करत म्हटलंय, 'तुमच्यासारख्या अमीरजाद्यांमुळे गरिबांच्या लेकींचे आणि त्यांचा बापांचे जीव जातात. तुम्ही सेलिब्रिटी आहात त्यामुळे तुम्ही असे संदेश देण्यापूर्वी समाजात काय चाललंय याचा विचार केला पाहिजे. हा मुद्दा फक्त फोटोपुरता मर्यादित नसून, तुम्ही नको ते आदर्श लोकांपुढे ठेवत आहात. मध्यमवर्गीय बाप कुठून देईल सांगा बीएमडब्ल्यू?'

4 / 5
एवढ्या लवकर कार गिफ्ट द्यायची काय गरज होती, असंही काहींनी म्हटलं आहे. यावर अद्याप अनुष्का किंवा निखिलने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या अनुष्का आणि निखिल त्यांच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

5 / 5
Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह