AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोरा फतेहीला भारत सोडावं लागणार? वर्क परमिट होणार रद्द? मंत्रालयात पोहोचली 10 वकिलांची टीम

अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दहा वकिलांची टीम तिच्याविरोधात थेट मंत्रालयात पोहोचली आहे. 'सरके चुनर' या गाण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. हा नेमका वाद काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या..

नोरा फतेहीला भारत सोडावं लागणार? वर्क परमिट होणार रद्द? मंत्रालयात पोहोचली 10 वकिलांची टीम
Nora Fatehi Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 23, 2026 | 2:03 PM
Share

अभिनेत्री नोरा फतेही तिच्या एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘केडी डेविल’ या कन्नड चित्रपटात तिच्यावर चित्रित झालेल्या ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याचे बोल अश्लील असल्याचा आरोप झाला. त्यानंतर हे गाणं सर्व प्लॅटफॉर्म्सवरून हटवण्यात आलं. हे प्रकरण इथेच मिटलं नसून आता 10 वकिलांची एक टीम थेट गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यांनी गृह मंत्रालयाकडे थेट नोराचं वर्क परमिट (कामाचा परवाना) रद्द करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर नोरा फतेहीला भारतातून डिपोर्ट केलं जावं, अशी मागणी या वकिलांनी केली आहे. ‘सरके चुनर’ या गाण्याचे बोल अत्यंत अश्लील असल्याचा आरोप करत याआधी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे गाणं हटवण्यात आलं आणि त्याचे बोल बदलण्याची सूचना देण्यात आली. तर दुसरीकडे गीतकार रकीब आलमने दिग्दर्शकांवर याचं खापर फोडलं आहे. दिग्दर्शक प्रेमने कन्नड भाषेतील मूळ गाण्याला जसंच्या तसं भाषांतर करून द्यायला सांगितल्याचा दावा त्याने केला आहे.

नोराविरोधात तक्रारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेहीविरोधात गृह मंत्रालयाशिवाय माहिती व प्रसारण मंत्रालय, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. हे गाणं नोरा आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे संजय दत्त किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांवर कोणतीच कारवाई का होत नाहीये, असाही सवाल उपस्थित होत आहे.

वकिलांचा आरोप काय?

वकिलांनी त्यांच्या याचिकेत आरोप केला आहे की, “सरके चुनर हे गाणं अत्यंत अश्लील, महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारं, सार्वजनिक नैतिकतेचा अपमान करणारं आहे. नोराने अशा प्रकारच्या गाण्याशी संबंध जोडून भारतात काम करण्याच्या तिच्या विशेषाधिकाराचा गैरवापर केला आहे.” वकिलांनी याचिकेत परदेशी कायदा, 1946 च्या तरतुदींचाही उल्लेख केला आहे. ज्या परदेशी नागरिकांच्या कृतींमुळे सार्वजनिक सभ्यता किंवा सुव्यवस्थेला बाधा येऊ शकतं, त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे, असं त्यात म्हटलंय.

नोराचं स्पष्टीकरण

गाण्यावरून झालेल्या वादानंतर नोराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत या विषयावर प्रतिक्रिया दिली होती. “मी मूळ कन्नड भाषेतील गाण्यावर डान्स केल्याने मला त्या गाण्याचे बोल माहीत नव्हते. नंतर निर्मात्यांनी ते हिंदीत भाषांतर करून तसंच प्रदर्शित केलं, ज्याबद्दल मला कोणतीच कल्पना नव्हती. मी हे गाणं तीन वर्षांपूर्वी चित्रित केलं होतं. तेव्हा मी त्याला होकार दिला होता, कारण तो एका मोठ्या चित्रपटाचा भाग होता आणि त्यात संजय दत्तचीही भूमिका होती. त्यामुळे अशा संधीला नाही म्हणणं मला योग्य वाटत नव्हतं. मला वाटलं होतं की हे गाणं ‘नायक नही खलनायक हूँ मै’चा रिमेक आहे. मला कन्नड भाषा समजत नाही, त्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्यावर मी विश्वास ठेवला. गाण्याच्या हिंदी डबिंगसाठी किंवा गाण्याचे बोल बदलण्यासाठी त्यांनी माझी परवानगी घेतली नव्हती”, असं स्पष्टीकरण नोराने दिलं होतं.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?