सारा अली खान, सुहाना वा तैमुर नाही, आहे आहे सर्वात श्रीमंत स्टार किड
बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत स्टार किड कोणता असा सवाल केला तर अनेकांचे उत्तर सारा, सुहाना किंवा तैमुर येईल. खरा टॉपवर कोणता स्टार किड आहे हे जाणून घ्या..ज्याच्याकडे किती संपत्ती आहे? कोणत्या कार आहेत आणि कमाईचे त्याचे मार्ग काय आहेत सर्व डिटेल्स पाहा

बॉलीवुडच्या सर्वात श्रीमंत स्टार किड्सचा विषय निघतो तेव्हा सर्वजण तैमुर अली खान, सारा अली खान किंवा सुहाना खान यांची नावे तोंडावर येतात. परंतू या नावाच्या पुढे जाऊन एक असा स्टार किड्स आहे जो कमाई आणि लाईफस्टाईलच्या बाबतील सर्वात टॉपवर आहे. चला तर पाहूयात अखेर बॉलीवूडचा श्रीमंत स्टार किड्स कोण आहे ? त्याची संपत्ती किती आणि त्यांच्या कमाईचे मार्ग कोणते आहेत ?
ऋतिक रोशन याची कमाई आणि नेटवर्थ काय ?
ऋतिक रोशन याची संपत्ती मोठी आहे. त्याने स्वत: बॉलीवूडमध्ये स्वतंत्र स्थान मिळवले आहे. तो अभिनेता राकेश रोशन यांचा मुलगा आहे.मीडियातील बातम्यांनुसार ऋतिक रोशन याची एकूण संपत्ती 3,130 कोटी रुपये आहे. ही कमाई त्याने केवळ चित्रपटातून नाही तर त्याचा बिझनेस, ब्रँड एंडोर्समेंट, फिटनेस ब्रँड आणि अनेक ठिकाणी गुंतवणूक करुन मिळवली आहे.
लक्झरी कारचे कलेक्शन
ऋतिक रोशनकडे लक्झरी कारचे भारी कलेक्शन आहे. त्याच्याजवळ Rolls Royce Ghost, Mercedes-Maybach S580, Ferrari, Mini Cooper, आणि Porsche Cayenne Turbo सारख्या आलिशान कार आहेत. या कारची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे.
ऋतिक रोशनच्या कमाईचे स्रोत काय ?
चित्रपट : ऋतिक याच्या एका चित्रपटाची फि सुमारे 65-75 कोटी रुपये असते.
ब्रँड एंडोर्समेंट: ऋतिक अनेक ब्रँडचा चेहरा आहे, त्याला जाहिरातून करोडोंची कमाई होते.
फिटनेस ब्रांड HRX: ऋतिक याचा स्वत:चा फिटनेस ब्रँड आहे. जो आज कोट्यवधीची कमाई करतो रियल ईस्टेट: ऋतिकने मुंबईतील जुहू येथे 100 कोटी रुपयांची प्रॉपर्टी देखील खरेदी केली आहे.
या ब्रँडचे प्रमोशनमधून बक्कळ कमाई होते
HRX: हा ऋतिक रोशनचा स्वत:चा फिटनेस आणि लाईफस्टाईल ब्रँड आहे.
Myntra: एक ऑनलाइन फॅशन रिटेलर आहे.
Hero Motocorp: एक प्रमुख भारतीय मोटरसायकल निर्माता
Nirma: एक प्रमुख भारतीय डिटर्जेंट ब्रँड.
Oppo: एक प्रमुख चीनी स्मार्टफोन ब्रँड आहे
Aeron: एक प्रमुख कपड्यांचा ब्रँड आहे.
Paragon: एक फुटवेअर ब्रँड आहे.
Mountain Dew: एक शीतल पेयाचा ब्रँड आहे.
Zebronics: एक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे.
Rado: एक लक्झरी घड्याळाचा ब्रँड आहे.
Garena Free Fire: हा एक लोकप्रिय मोबाईल बॅटल रॉयल गेम आहे.
Cure.fit: एक हेल्थ एण्ड फिटनेस कंपनी आहे.
Burger King: एक प्रसिद्ध फास्ट-फूड चेन आहे.
Clear: एक शॅम्पू ब्रँड आहे.
Zomato: एक ऑनलाइन फूड डिलीव्हरी प्लेटफॉर्म आहे
RummyCircle: एक ऑनलाइन रमी गेमिंग प्लेटफॉर्म आहे.
MyFitness: एक पीनट बटर ब्रँड.
Ferrero Rocher: एक चॉकलेट ब्रँड.
