AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सूर्यवंशम’ सिनेमातील छोट्या भानूप्रतापला ओळखणं कठीण, 25 वर्षांत भन्नाट ट्रांसफॉर्मेशन

'सूर्यवंशम' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराल आता ओळखणं देखील कठीण, 25 वर्षांत त्याच्यातील भन्नाट ट्रांसफॉर्मेशन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'सूर्यवंशम' सिनेमातील बालकलाकाराची चर्चा... फोटो पाहिल्यानंतर म्हणाल...

'सूर्यवंशम' सिनेमातील छोट्या भानूप्रतापला ओळखणं कठीण, 25 वर्षांत भन्नाट ट्रांसफॉर्मेशन
| Updated on: Mar 08, 2024 | 12:11 PM
Share

मुंबई | 8 मार्च 2024 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज देखील बिग बी यांचे अनेक सिनेमे चाहते तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने पुन्हा पाहातात. अमिताभ बच्चन यांच्या हीट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘सूर्यवंशम’… सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली आहे. पण सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना चाहते अद्यापही विसरु शकलेले नाहीत. सिनेतान अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराला ओळखणं देखील आता कठीण झालं आहे.

भानू प्रताप सिंह म्हणजे आमिताभ बच्चन यांचा नातू आणि मुलाच्या भूमिकेत बालकलाकाराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वतःच्या संस्कारांनी चाहत्यांचं मन जिंकलं. चिमुकल्या मुलाने फक्त चाहत्यांना नाहीतर, सिनेमात कठोर दिसणाऱ्या भानू प्रताप सिंह यांना देखील स्वतःच्या प्रेमात पाडलं.

सांगायंच झालं तर, ‘सूर्यवंशम’ सिनेमा प्रदर्शित होऊन 25 वर्ष झाली आहेत आणि सिनेमातील छुटकू आता तरुण झाला आहे. 25 वर्षांमधील त्याचं भन्नाट ट्रांसफॉर्मेशन पाहून तुम्हाला देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमातील चिमुकल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्याच्या लहानपणाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर, अभिनेता आनंद वर्धन आहे. आनंद वर्धन याने फार लहान असताना अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सांगायचं झालं तर, आनंद वर्धन याचे आजोबा पीबी श्रीनिवास हे प्रसिद्ध गायक होते.

आजोबा प्रसिद्ध गायक असल्यामुळे आनंद यांचं अनेक सेलिब्रिटींच्या घरी येणं – जाणं होतं. अशात अनेकांनी आनंद याचा गोंडसपणा सर्वांना आवडायचा. म्हणून त्याला सिनेमांमध्ये काम देखील मिळू लागलं होतं. आनंद वर्धन याने वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी सिनेमात काम करायला सुरुवात केली. त्याने बालकलाकार म्हणून जवळपास 25 सिनेमांमध्ये काम केलं. आनंद वर्धन याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा नंदी पुरस्कारही मिळाला आहे.

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर आनंद वर्धन याने अभिनयाचा निरोप घेतला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आनंद याने अभिनय करणं सोडलं. आनंद वर्धन याने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आनंद वर्धन याच्या लूकची चर्चा रंगली आहे. आनंद वर्धन आता 33 वर्षांचा आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंद सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आनंद लवकरच एका तेलगू सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून दिसणार असल्याची चर्चा आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल