AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Junior G : लाडका ज्यूनियर-जी कुठे गायब झाला, आता नेमका कसा दिसतो? समोर आलेली माहिती वाचून धक्काच बसेल!

ज्यूनियर जी ही मालिका सर्वांनाच माहिती आहे. दुरदर्शनवर ही मालिका प्रक्षेपित केली जायची. या मालिकेत ज्यूनियर जी हे पात्र साकारणारा मुलगा आता नेमकं काय करतोय? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता या मुलाबाबतची नेमकी माहिती समोर आली आहे.

Junior G : लाडका ज्यूनियर-जी कुठे गायब झाला, आता नेमका कसा दिसतो? समोर आलेली माहिती वाचून धक्काच बसेल!
JUNIOR G ACTOR ABHISHEK KOCHHARImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 01, 2026 | 3:13 PM
Share

What Junior G Actor Abhishek Kochhar Doing : कधीकाळी 90 च्या दशकात मुकेश खन्ना यांची ‘शक्तिमान’ ही मालिका संपूर्ण देशात प्रसिद्ध होती. या मालिकेत मुखेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका साकारली होती. ही मालिका सुरू झाल्यावर लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेजण दुरदर्शन सुरू करून बसायचे. त्यानंतर 2001 साली शक्तिमानला टक्कर देणारी ‘ज्यूनियर जी’ ही मालिका आली. या मालिकेलाही लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या मालिकेत अभिनेता अमितेश कोचर यांने ज्यूनियर जीची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या सुपरहिरोच्या भूमिकेच्या अनेकजण प्रेमात पडले होते. दरम्यान, आता हाच ज्यूनियर जी म्हणजेच अमितेश कोचर मात्र अभिनय क्षेत्रापासून खूप दुर आहे. तो नेमका कुठे आहे? ते नेमका कसं आयुष्य जगतोय? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ज्यूनियर जी आता नेमकं काय करतो?

ज्यूनियर जी या मालिकेत भूमिका केल्यामुळे अमितेश कोचर तेव्हा रातोरात स्टार झाला होता. या मालिकेत काम करत असताना तो अवघ्या 12 ते 13 वर्षांचा होता. आता मात्र तो अभिनयापासून खूप दूर आहे. ज्यूनियर जी या मालिकेत त्याने बालकलाकार म्हणून ‘गौरव’ची भूमिका साकारली होती. ज्यूनियर जी या मालिकेतील गौवर म्हणजेच ज्यूनियर जी आता खूप मोठा झाला आहे. तो एक ट्रॅव्हलर आहे. त्याला फिरायला खूप आवडतं.

ज्यूनियर जीचे आहे यूट्यूब चॅनेल

त्याच्या सोशल मीडिया खात्यावर नजर टाकली तर त्याच्या फिरण्याच्या आवडीविषयी तुम्हाला समजेल. त्याचे एक यूट्यूब चॅनेलही आहे. फिरायला गेल्यानंतर तो तेथील व्लॉग्स आपल्या या चॅनेलवर अपलोड करतो. त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नाव ‘Amitesh Vlogs’ असे आहे. विशेष म्हणजे अमितेशचे लग्नही झालेले आहे. अेक व्लॉग्समध्ये तो आपल्या पत्नीसोबतही दिसतो. त्याला पाळीव प्राणी खूप आवडतात. त्याच्याकडे एक कुत्रा आहे. त्या कुत्र्यावर तो खूप प्रेम करतो.

दरम्यान, लहानपणी साकारलेल्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा अमितेश आता मात्र बॉलिवुडमध्ये सक्रिय नाही. त्याला मनमुराद आयुष्य जगायला आवडते. आपल्या काही ब्लॉग्समध्ये तो ज्यूनियर जी या मालिकेबद्दल बोलतानाही तुम्हाला दिसेल.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग