This Week Releasing : OTTवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार अनेक चित्रपट, जाणून घ्या कोणता चित्रपट कुठे पाहाल?

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टार, झी 5 या OTT प्लॅटफॉर्मवर 29 ऑक्टोबर रोजी अनेक बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणता चित्रपट कुठे पाहाल...

This Week Releasing : OTTवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार अनेक चित्रपट, जाणून घ्या कोणता चित्रपट कुठे पाहाल?
OTT Release
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 10:55 AM

मुंबई : नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टार, झी 5 या OTT प्लॅटफॉर्मवर 29 ऑक्टोबर रोजी अनेक बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणता चित्रपट कुठे पाहाल…

आफत-ए-इश्क (Zee5)

झी स्टुडिओज निर्मित, ‘अफत-ए-इश्क’ ही लल्लोची आणि तिच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची कथा आहे. हा एक डार्क ड्रामा कॉमेडी आहे. नेहासह इंद्रजित नट्टोजी दिग्दर्शित ‘अफत-ए-इश्क’ चे भारतीय रूपांतर ‘लिझा, द फॉक्स-फेरी’ या ZEE5 पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय हंगेरियन चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. आफत-ए-इश्कची एक मनोरंजक संकल्पना आहे. नेहा शर्मा, दीपक डोबरियाल, अमित सियाल, नमित दास आणि इला अरुण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘आफत-ए-इश्क’ 29 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हम दो हमारे दो (डिस्ने हॉटस्टार)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हम दो हमारे दो’ चित्रपटाची कथा एका विवाहित जोडप्यावर आहे. या जोडप्यांना त्यांच्या पालकांना स्वतःसाठी दत्तक घ्यायचे आहे. हा एक कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा चित्रपट असेल. निर्मात्यांना आशा आहे की, ही अनोखी कल्पना लोकांना चित्रपटाकडे आकर्षित करेल. राजकुमार आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त, रत्ना पाठक शाह आणि परेश रावल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे.

डायबुक (अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ)

इमरान हाश्मी स्टारर हॉरर थ्रिलर ‘डायबुक’च्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की ‘डायबुक’ हा सुपरहिट मल्याळम चित्रपट ‘एजरा’चा (2017) अधिकृत रिमेक आहे. ज्याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. त्याच वेळी, जय कृष्णन यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.

कॉल माय एजेंट (नेटफ्लिक्स)

शाद अली दिग्दर्शित ‘कॉल माय एजंट’ ही वेब सीरीज असून, ती 29 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. ही वेब सीरीज फ्रेंच भाषेतील कॉमेडी-ड्रामा सीरीज ‘डिक्स पोर सेंट’ वरून प्रेरित आहे. नवीन नेटफ्लिक्स शोमध्ये रजत कपूर, सोनी राझदान, दिया मिर्झा, आहाना कुमरा आणि आयुष मेहरा यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. या मालिकेचे लेखन अब्बास अजीज दलाल आणि हुसैन दलाल यांनी केले आहे.

आर्मी ऑफ थीव्ह्स (नेटफ्लिक्स)

‘आर्मी ऑफ थीव्ह्स’ हा हॉलिवूड चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :

शाहरुख खानपासून ते रणबीर कपूरपर्यंत, ‘या’ बॉलिवूडकरांसाठी समीर वानखेडे ठरलेयत ‘दबंग’ अधिकारी!

Happy Birthday Aditi Rao Hydari | राजघराण्याशी संबंधित अभिनेत्री अदिती राव हैदरी, वैयक्तिक आयुष्य देखील कॅमेरापासून दूर ठेवते!

शेवटच्या काळात कर्जबाजारी झाल्या होत्या मीना कुमारी, कर्जमुक्त होण्यासाठी राहता बंगलाच देण्याचा निर्णय घेतला!

Pooja Batra : आपल्या हॉट स्टाईलने सगळ्यांना वेड लावणाऱ्या पूजा बत्राचं मन आलं नवाब शाहवर, वाचा लव्हस्टोरी

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.