AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Top 5 Romantic Web Series : रोमँटिक सीरीज पाहायला आवडतात? मग, ओटीटीवरील ‘या’ खास सीरीज नक्की पाहा!

आजकाल OTT वर भरपूर सामग्री आहे. प्रेक्षक आता सिनेमागृहापेक्षा ओटीटीकडे अधिक लक्ष देत आहेत. ओटीटी ट्रेंड सुरू झाल्यापासून, ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दररोज प्रत्येक शैलीचे चित्रपट आणि वेब सीरीज येथे प्रदर्शित होत आहेत.

Top 5 Romantic Web Series : रोमँटिक सीरीज पाहायला आवडतात? मग, ओटीटीवरील ‘या’ खास सीरीज नक्की पाहा!
Romantic Series
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 8:29 AM
Share

मुंबई : आजकाल OTT वर भरपूर सामग्री आहे. प्रेक्षक आता सिनेमागृहापेक्षा ओटीटीकडे अधिक लक्ष देत आहेत. ओटीटी ट्रेंड सुरू झाल्यापासून, ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दररोज प्रत्येक शैलीचे चित्रपट आणि वेब सीरीज येथे प्रदर्शित होत आहेत.

जर, तुम्हाला रोमान्स आणि रोमँटिक चित्रपट किंवा सीरीज आवडत असतील, तर तुम्ही नेटफ्लिक्स, Amazon प्राइम व्हिडीओ, झी 5, एमएक्स प्लेअर, ऑल्ट बालाजी आणि सोनी लिव्ह सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मला भेट देऊन रोमँटिक वेब सीरीज पाहू शकता. ज्यात प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतील अशा प्रेमकथा वेब सीरीज’च्या माध्यमातून दाखवल्या गेल्या आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच टॉप 5 रोमँटिक वेब सीरीज घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट केल्या पाहिजेत….

बंदिश बँडीट्स

बंदिश बँडीट्स ही Amazon Prime वर एक सीरीज आहे, जी पूर्णपणे संगीतावर आधारित आहे. ‘बंदिश बँडीट्स’ नावाच्या या वेब सीरीजमध्ये नसीरुद्दीन शाह शास्त्रीय गायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. प्रेम आणि संगीत ही एक अनोखी गुंफण असलेली प्रेमकथा आहे, जी तुम्ही अवश्य पाहायला हवी.

लिटल थिंग्ज

नुकताच ‘लिटल थिंग्स’चा चौथा सीझन रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी त्याचे तीन सीझन खूप पसंत केले गेले होते, म्हणूनच निर्मात्यांनी सीरीजचा चौथा सीझन आणला आहे. नेटफ्लिक्सवरील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची एक सुंदर कथा आहे. जी एकत्र राहतात पण विवाहित नाहीत, तरीही चांगल्या आणि वाईट काळात एकमेकांचे मित्र असतात. ध्रुव सहगल आणि मिथिला पालकर यांनी मुख्य भूमिका स्कारल्या आहेत.

कर ले तू भी मोहब्बत

राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी याआधी छोट्या पडद्यावर त्यांची दमदार केमिस्ट्री दाखवली आहे आणि आता त्यांची जादू ओटीटीवरही चांगली चालली आहे. ‘कर ले तू भी मोहब्बत’चे तीन सीझन आले आहेत आणि प्रत्येकाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे.

मिसमॅच्ड

या सीरीजमध्ये ‘मिसमॅच्ड’ असूनही दोन व्यक्ती कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात. या चित्रपटात प्राजक्ता कोळी, रोहित सराफ आणि रणविजय सिंघा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ही सीरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

परमनंट रूममेट्स

सुमित व्यास आणि निधी सिंह यांच्या अभिनयाने सजलेली, ही वेब सीरीज एका प्रेमळ जोडप्याची कथा आहे. ज्यांनी तीन वर्षे एकमेकांपासून लांब राहत डेटिंग केली. यूट्यूबवर ‘परमनंट रूममेट्स’ चे दोन सीझन यशस्वी झाले आहेत. यात सुमीत व्यास, निधी सिंह, दीपक कुमार मिश्रा मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

हेही वाचा :

Sanskruti Balgude : ‘सुनहरा रूप..’ म्हणत अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं शेअर केले सुंदर फोटो; पाहा क्लासी लूक

Kavita Kaushik : कविता कौशिकने बीचवर बिकिनीमध्ये केला योगा, किलर लूक पाहून चाहते घायाळ

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.