Vijay Mallya Web Series : कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी येणार विजय मल्ल्यावरची वेबसिरीज? वाचा सविस्तर

MX Player आता विजय मल्ल्याची वेब सिरीज त्याच्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल. इतकंच नाही तर MX Playerदेखील निर्माता म्हणून या प्रकल्पात सहभागी झाला आहे.

Vijay Mallya Web Series : कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी येणार विजय मल्ल्यावरची वेबसिरीज? वाचा सविस्तर
विजय मल्ल्या
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 9:30 PM

मुंबई : देशातला उद्योगपती आणि वादग्रस्त व्यक्तीमत्व असलेला विजय मल्ल्या(Vijay Mallya)… देशातील सर्वात मोठी मनी लाँड्रिंग आणि कोट्यवधींच्या कर्जातून सुटका झाल्यानंतर आता परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या आयुष्याची कहाणी पडद्यावर दाखवली जाणार आहे.

पुस्तकाचे हक्क घेतले होते विकत  गेल्या वर्षी निर्माता सुनील बोरा यांच्या प्रॉडक्शन हाऊस ऑलमाईटीने विजय मल्ल्यावरील पुस्तकाचे हक्क विकत घेतले होते आणि लवकरच त्यावर एक वेबसिरीज बनवण्याची घोषणाही करण्यात आली होती. आता याची अपडेट माहिती समोर येतेय. विजय मल्ल्यावर बनवली जाणारी वेब सिरीज एक मोठा OTT प्लॅटफॉर्म स्ट्रीम करणार आहे.

MX Player वर रिलीज होईल होय, MX Player आता विजय मल्ल्याची वेब सिरीज त्याच्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल. इतकंच नाही तर MX Playerदेखील निर्माता म्हणून या प्रकल्पात सहभागी झाला आहे. म्हणजेच निर्माता सुनील बोरा यांच्या ऑलमाईटी या प्रोडक्शन कंपनीच्या सहकार्याने एमएक्स प्लेयर या वेब सिरीजची निर्मितीही करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर खऱ्या घटनांवर बनवलेल्या वेब सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आतापर्यंत मिळाला आहे. अशा स्थितीत विजय मल्ल्याची वेब सिरीज कशी असेल, याविषयी उत्कंठा असेल.

2022पर्यंत शूटिंग सुरू होईल याआधी Mx Player वरील प्रकाश झा यांच्या आश्रम या वेब सिरीजचे दोन पार्ट्स खूप हिट झाले. मल्ल्याच्या वेबसिरीजमधील कास्टिंगबद्दल अजून ठरलेले नसले तरी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कलाकाराला हा रोल मिळण्याची चर्चा आहे. यासोबतच या वेबसीरिजचे शूटिंगही पुढील वर्षी 2022पर्यंत सुरू होणार आहे.

विजय मल्ल्या आणि वाद विजय मल्ल्या एक भारतीय उद्योगपती आहे, ज्यावर भारतीय बँकांमधून 9 हजार कोटी रुपये घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये राहतो. त्याचा जन्म 18 डिसेंबर 1955 रोजी कोलकाता येथे झाला. विजय मल्ल्या युनायटेड स्पिरिट आणि किंगफिशर एअरलाइन्सचा अध्यक्ष आहे. किंगफिशर एअरलाइन्स बंद करण्यात आली आहे तर युनायटेड स्पिरिट्स कंपनीची विक्री करण्यात आली आहे. याशिवाय विजय मल्ल्या सनोफी इंडिया आणि बिअरकॉर्प सायन्स कंपनीचा अध्यक्षही राहिला आहेत. मल्ल्यावर बँकांची फसवणूक केल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. विजय मल्ल्या 2 मार्च 2016 रोजी भारत सोडून गेला. सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग वेगवेगळ्या प्रकरणात विजय मल्ल्याचा शोध घेत आहेत.

John Abraham : ‘मी मोठ्या पडद्यावरचा हिरो, ओटीटीची कल्पनाही नाही करू शकत’

Oo Antava.. Oo Oo Antava : समंताच्या गाण्याचा धुमाकूळ, बेभान होऊन थिएटरमध्ये थिरकतायत चाहते…

क्रेडिट कार्डची कुंडली; जाणून घ्या, क्रेडिट कार्डवरील छुप्या शुल्कांची माहिती

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.