AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोडलं बॉलिवूड, बनली आई… ‘पाप’मधील उदिता गोस्वामी सध्या काय करते?

'पाप' या चित्रपटातील 'लागी तुमसे मन की लगन' हे गाणं आजही अनेकांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. या चित्रपटातील अभिनेत्री उदिता गोस्वामी काही वर्षांनंतर इंडस्ट्रीपासून दूर गेली. ती सध्या कुठे आहे, काय करते हे जाणून घेऊयात..

सोडलं बॉलिवूड, बनली आई... 'पाप'मधील उदिता गोस्वामी सध्या काय करते?
Udita GoswamiImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 07, 2024 | 6:52 PM
Share

मुंबई : 7 मार्च 2024 | बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आले, ज्यांनी कमी वयातच आणि पहिल्यावहिल्या चित्रपटातूनच प्रसिद्धी मिळवली. मात्र मोजकेच चित्रपट केल्यानंतर हे कलाकार अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उदिता गोस्वामी. उदिताने 2003 मध्ये जॉन अब्राहमच्या ‘पाप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून उदिताने आपली विशेष छाप सोडली होती. त्यानंतर ‘जहर’ या चित्रपटात ती झळकली. मात्र काही चित्रपटांनंतरच उदिताने एका दिग्दर्शकाशी लग्न केलं आणि लग्नानंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली.

2005 मध्ये ‘जहर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उदिता आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांची ओळख झाली. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मोहित सुरीचा हा पहिलाच चित्रपट होता आणि शूटिंगदरम्यानच त्याचं उदितावर प्रेम जडलं होतं. चित्रपटानंतर जवळपास नऊ वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि अखेर 2013 मध्ये मोहित आणि उदिता लग्नबंधनात अडकले. या दोघांना मुलगी देवी आणि मुलगा कर्मा आहे. उदिता लग्नापूर्वी 2012 मध्ये एका चित्रपटात झळकली होती. लग्नानंतर मात्र तिने अभिनय क्षेत्राला रामराम केला.

लग्न आणि मुलाबाळांनंतर उदिता जरी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली असली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. विशेष म्हणजे उदिताने चित्रपटानंतर एका वेगळ्याच क्षेत्रात आपलं नाव कमावलंय. उदिता एका यशस्वी प्रोफेशनल डीजे म्हणून ओळखली जाते. तिचे देशभरात मोठमोठे शोज होतात आणि त्यातून ती चांगली कमाई करते. उदिताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या खासगी आयुष्याची झलक पहायला मिळते. उदिताच्या फिटनेसमध्ये इतक्या वर्षांत जराही फरक पडला नाही. तिच्या ग्लॅमरस फोटोंना सोशल मीडियावर भरभरून लाइक्स मिळतात.

उदिताचा जन्म देहरादूनमध्ये झाला. तिचे वडील वाराणसीचे तर आई शिलाँगची आहे. उदिता ही पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि इमरान हाश्मी यांची वहिनी आहे. तिने मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.