REVIEW : सनी देओलच्या मुलाचं पदार्पण, कसा आहे ‘पल पल दिल के पास’?

या लव्हस्टोरीला अॅडव्हेंचरची जोड दिल्यामुळे आपण वेगळं काही तरी अनुभवणार असल्याचं आपल्याला जाणवायला लागतं. कथा जशी पुढे सरकते तसा मात्र तुमची थोडी निराशा होते.

REVIEW : सनी देओलच्या मुलाचं पदार्पण, कसा आहे 'पल पल दिल के पास'?
Follow us
| Updated on: Sep 21, 2019 | 10:32 AM

बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सला लाँच करण्याचा सिलसिलाच सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रयोगशील सिनेमांऐवजी स्टारकिड्सला लाँच करण्यासाठी लव्हस्टोरीच निवडल्या जातात. गेल्या वर्षभरातला आढावा घेतला तर सगळ्याच स्टार्सनं आपल्या मुलांना लाँच करण्याची हौस भागवून घेतली आहे. आता यात यश नेमकं कोणाच्या वाट्याला आलं हे विचारु नका बरं का ! आता या यादीत धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलचीही भर पडलीये. देओल कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे धर्मेंद्र यांनी सनी आणि बॉबी नंतर आता करणला ‘पल पल दिल के पास’ या सिनेमाव्दारे (Pal Pal Dil Ke Paas Review) रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे. दिग्दर्शनाची धुराही दुसऱ्या कोणाच्या हातात देण्याच्या भानगडीत न पडता स्वत: सनी देओलनेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाचं शिवधनुष्य उचललं. आजोबा निर्माता, वडील दिग्दर्शक असल्यावर मग काय विचारुच नका राव ! बालहट्ट पुरवण्यासाठी जो काही आटापिटा आपले वडील करतात ते सगळं सनी पाजींनी या सिनेमात केलंय. पण करणमध्ये ना धर्मेंद्र सारखा हिमॅनवाला चार्म आहे ना सनीपाजींसारखी ढाई किलो का हात वाली पॉवर.

एका गोंडस, छानशा बाळाप्रमाणे निरागस चेहरा घेऊन, हसावं की रडावं या कन्फ्यूजनमध्ये करणला संपूर्ण सिनेमाभर वावरताना बघून आपण कपाळावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. धर्मेंद्र सनी देओलला ‘बेताब’मधून लाँच करणार होते, तेव्हा सगळ्यांना ज्यु. धर्मेंद्रला बघण्याची उत्सुकता होती. ‘बेताब’ नंतर सनी देओलनं स्वत:ला सिद्ध केलं. स्वत:ची वेगळी इमेज निर्माण केली. आता सनी देओलचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण (Pal Pal Dil Ke Paas Review) करतोय म्हटल्यावर असंच चित्र होतं. पण हिमाचल प्रदेशातलं विहंगम आणि डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य हाच या दोन सिनेमांमधला समान धागा. बाकी या सिनेमाला ना ‘बेताब’ची सर आहे… ना करणला सनी देओलची.

चित्रपटाची कथा आहे ट्रेकिंग कंपनीचा मालक, सगळ्यांचा आवडता गाईड करण सेहगल (करण देओल) आणि प्रसिद्ध व्हिडीओ ब्लॉगर सेहर सेठी (सेहर बांबा) यांची. कुटुंबाच्या वार्षिक रियुनियनमध्ये सहभागी होण्याची सेहरची इच्छा नसते. त्यामुळे यात सहभाग टाळण्यासाठी ती साहसी ट्रीपला जाण्याचा निर्णय घेते. ट्रीपदरम्यान करण आणि सेहरची भेट होते आणि मग सुरु होते अॅडव्हेंचरस लव्हस्टोरी. सेहर आणि करण एकमेकांच्या प्रेमात पडतात. करण सेहरसाठी दिल्लीत येतो. पण अचानक असं काही घडतं की सेहर कोमात जाते आणि कथानक वेगळं वळण घेतं. आता सेहर कोमात कशी काय जाते ? हिमाचलमधील पहाडात रंगणारी ही प्रेमकथा अचानक काय वळण घेते? सेहर परत शुद्धीवर येते का ? हा सगळा खेळ कोणी रचला असतो ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘पल पल दिल के पास’ बघावा लागेल.

हा सिनेमा सनी देओलनं अ्ॅडव्हेंचर लव्हस्टोरी करण्याचा प्रयत्न केलाय. मध्यंतरापूर्वी हिमाचल प्रदेशमधील अनेक विहंगम दृश्य तुम्हाला खुश करतील. हिमाचल प्रदेशच्या सौंदर्यात प्रेक्षक नक्कीच हरवून जातील. सिनेमा मध्यंतरापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये घडतो. तर मध्यंतरानंतर सिनेमाची गोष्ट दिल्लीत घडते. या लव्हस्टोरीला अॅडव्हेंचरची जोड दिल्यामुळे आपण वेगळं काही तरी अनुभवणार असल्याचं आपल्याला जाणवायला लागतं. कथा जशी पुढे सरकते तसा मात्र तुमची थोडी निराशा होते. याआधी हिंदी सिनेमा कोळून प्यायलेली कथा आपल्याला दिसू लागते. आपण काही ठोकताळे आखायला सुरुवात करतो. आता पुढे हे असंच होईल असं मोठ्या आविर्भावात स्वत:ला सांगू लागतो. मात्र पुन्हा एकदा कथा अचानक वेगळं वळणं घेते. अशा बऱ्याच घटना एकामागोमाग एक मध्यंतरानंतर घडायला लागतात. त्यामुळे साहजिकच कमकुवत कथेवर मोठा डोलारा बांधण्याचा सनी देओलचा अट्टहास आपल्याला कळून चुकतो. घटना वेगवान घडतात..तेवढ्याच वेगवान संपतातही.. सिनेमाचा शेवट बऱ्याच प्रश्नांची उत्तरं न देता घाईघाईत केल्यासारखा वाटतो. त्यामुळे सिनेमा संपल्यावरही अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. चित्रपटात शेवटपर्यंत फुल ऑन ड्रॅमेटिक प्रसंगांची पेरणी करण्यात आल्यामुळे तुम्हाला अजिबात बोअर होणार नाही.

सनी देओलनं उभारलेलं हे मिशन (Pal Pal Dil Ke Paas Review) निश्चितच वेगळं आहे. दिग्दर्शकाची मेहनत पूर्णपणे यामध्ये दिसते. पण ज्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास होता त्याच्यावर मेहनत घेण्याचं मात्र सनी देओल विसरला. करण दिसतो क्यूट..पण अभिनय, डान्स, एक्सप्रेशन या सगळ्यावर त्याला मेहनत घेण्याची घरज आहे. सध्या बॉलिवूडमधली स्पर्धा बघता करणला जर लंबी रेस का घोडा बनायचं असेल तर त्यानं स्वत:वर बरीच मेहनत घेण्याची गरज आहे. सहर बाम्बाच्या रुपात बॉलिवूडला नवी अभिनेत्री मिळालीये. तिचा पडद्यावरचा वावर बघून हा तिचा पहिला चित्रपट आहे असं अजिबात वाटणार नाही. इमोशनल सीनमध्ये तिने कमाल केलीये. बऱ्याच प्रसंगात ती करणवर वरचढ ठरलीये..पण एवढं सगळं असून सुद्धा सिनेमात कुठेतरी तिची करणसोबतची केमिस्ट्री मिसिंग वाटते. तुम्ही या जोडीशी कनेक्ट नाही होऊ शकत. मेघना मलिकनं छोट्या भूमिकेत आपली छाप सोडलीये. सचिन खेडेकर, सिमॉन सिंग यांच्या वाट्याला करण्यासारखं फार काही नव्हतं. हिमान धामीजाची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. हिमाचलचं सौंदर्य त्यानं अचूक टिपलंय. सिनेमाचं संगीत या सिनेमाची जमेची बाजू आहे. विशेषत: सिनेमाचं टायटल साँग मस्त जमून आलंय..

REVIEW : कसा आहे Section 375 ?

एकूणच काय तर प्रेमकथेसोबतच अॅडव्हेंचर, हिमाचल प्रदेशचं सौंदर्य बघायचं असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही देओल कुटुंबाचे फॅन्स असाल तर हा सिनेमा तुम्हाला निराश करणार नाही. फक्त सनी देओलनं जशी आपल्या मुलाच्या लाँचिंगवर मेहनत घेतलीये तशीच त्याने त्याच्या अभिनयावर घेतली असती तर हा सिनेमा बघताना अजून मजा आली असती असं राहून राहून वाटतंय..’टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय अडीच स्टार्स

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.