‘आप’ खासदार राघव चड्ढा यांच्याशी परिणीती चोप्रा लवकरच करणार साखरपुडा? रोकाची तयारी सुरू

परिणीतीने 2011 मध्ये 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती 'इशकजादे' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली.

'आप' खासदार राघव चड्ढा यांच्याशी परिणीती चोप्रा लवकरच करणार साखरपुडा? रोकाची तयारी सुरू
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 3:40 PM

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात नेमकं काय शिजतंय, याची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, ते एकमेकांचे जुने मित्र आहेत का, ते लग्न करणार आहेत का असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. यावर अद्याप दोघांनी थेट कोणतं उत्तर दिलेलं नाही. मात्र आता परिणीती आणि राघव यांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. परिणीती आणि राघव यांना जेव्हा एकत्र डिनरला गेल्याचं पहायला मिळालं, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर पुन्हा गुरुवारी या दोघांना एकत्र लंच डेटला पाहिलं गेलं.

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये सध्या लग्नाविषयी चर्चा सुरू आहे. हे दोघं एकमेकांना ओळखतात, एकमेकांना पसंत करतात, दोघांचे कुटुंबीयसुद्धा एकमेकांना ओळखतात. म्हणूनच आता लवकरच या दोघांचा रोका पार पडणार असल्याचं कळतंय. याची अधिकृत घोषणा दोघांचे कुटुंबीय लवकरच करतील, असं म्हटलं जातंय.

हे सुद्धा वाचा

परिणीती आणि राघव यांच्यासाठी दोघांचे कुटुंबीय खुश आहेत. मात्र दोघांच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ मिळताच रोका पार पाडला जाईल, असं समजतंय. या कार्यक्रमाला जवळचे कुटुंबीय उपस्थित राहतील. राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय.

परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

परिणीतीसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर जेव्हा राघव यांना विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही मला राजनितीबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नाही.” लग्नाबद्दल विचारलं तेव्हा “जेव्हा लग्न करेन तेव्हा तुम्हाला सांगेन” असं उत्तर दिलं.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.