AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपट असावा तर असा, बॉक्स ऑफिसनंतर OTT करतोय राज्य, 24 तासात बनला नंबर-1, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

याला म्हणतात चित्रपट, बॉक्स ऑफिसनंतर आता या चित्रपटाने OTT वरही केला कब्जा. प्रदर्शित होताच काही तासांमध्ये टॉप-1 वर करत आहे ट्रेंड. पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी.

चित्रपट असावा तर असा, बॉक्स ऑफिसनंतर OTT करतोय राज्य, 24 तासात बनला नंबर-1, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
| Updated on: Jul 12, 2026 | 6:58 PM
Share

दर आठवड्याला विविध OTT प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात. मात्र, त्यापैकी फारच कमी चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि ट्रेंडिंगमध्ये अव्वल स्थान पटकावतात. सध्या नेटफ्लिक्सवर ‘पेड्डी’ या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाने अशीच कमाल केली आहे. थिएटरमध्ये दमदार कमाई केल्यानंतर या चित्रपटाने OTT वरही आपला दबदबा कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, 9 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत हा चित्रपट प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक पाहिला जाणारा आणि ट्रेंडिंगमध्ये नंबर-1 ठरला आहे.

‘पेड्डी’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटातील दमदार कथा, भावनिक प्रसंग, थरारक ॲक्शन आणि क्रीडाविषयक कथानकामुळे प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत या चित्रपटाने अव्वल स्थान मिळवले आहे.

दमदार स्टारकास्ट

सुमारे 3 तास 7 मिनिटे कालावधी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले आहे. चित्रपटात राम चरण, जाह्नवी कपूर, दिव्येंदू शर्मा, शिव राजकुमार, जगपती बाबू आणि बोमन इराणी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटात ॲक्शन, क्रीडा, भावनिक संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास यांचा उत्तम मेळ घालण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहते.

बॉक्स ऑफिसवरही दमदार यश

‘पेड्डी’ने केवळ OTT वरच नाही तर चित्रपटगृहांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारतात या चित्रपटाने 180 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली, तर जागतिक स्तरावर त्याचा गल्ला सुमारे 333 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. हिंदी भाषेतील कमाई तुलनेने कमी असली, तरी इतर भाषांमध्ये आणि परदेशातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

‘पेड्डी’ची कथा एका ग्रामीण भागात राहणाऱ्या दिहाडी मजुराभोवती फिरते. आर्थिक अडचणींमध्ये जीवन जगत असतानाही त्याच्यामध्ये असामान्य क्रीडा कौशल्य दडलेले असते. तो उत्कृष्ट क्रिकेटपटू असून कुस्तीमध्येही पारंगत असतो. स्वतःच्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर तो स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करतो. याचबरोबर आपल्या गावाला अधिकृत मान्यता मिळावी आणि तेथे रेल्वे स्थानक उभारले जावे, यासाठीही तो अथक प्रयत्न करत राहतो. त्याचा संघर्ष, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचा प्रवास हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला